विद्यार्थिनीवर लोणीच्या हॉटेलमध्ये अत्याचार | पुढारी

विद्यार्थिनीवर लोणीच्या हॉटेलमध्ये अत्याचार

लोणी : पुढारी वृत्तसेवा

वीस वर्षांच्या तरुणीला धमकी देवून, लोणीतील एका हॉटेलमध्ये तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माउली ऊर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गायके (रा. लोणगाव, ता. माजलगाव, जि. बीड) याच्याशी पीडित तरुणीची इंस्टाग्रामवर ओळख झाली.

आरोपीने ओळख करून या तरुणीस लोणी येथील बस स्टँडवर दुपारच्या सुमारास भेटण्यास बोलावले. तरुणीला त्याने लोणी येथील एका हॉटेलमध्ये नेले. रूममध्ये त्याने पीडित तरुणीसमवेत फोटो काढले. फोटो व्हायरल करून, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकील, अशी धमकी देत तरुणीवर अत्याचार केला.

औरंगाबाद : भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये

यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात देखील पुन्हा तिला हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार केला. माउली गायके याने त्या तरुणीच्या वडिलांना फोनवरून धमकी दिली.

दरम्यान, स्वतःजवळील फोटो इंस्टाग्रामवर टाकून तरुणीची बदनामी केली, अशी फिर्याद पीडित तरुणीने लोणी पोलिस स्टेशनला दिली. माउली गायकेविरुद्ध विविध कलमांन्वय्ये गुन्हा दाखल झाला.डीवायएसपी संजय सातव, स.पो. नि. समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार असलेल्या शोध पीएसआय योगेश शिंदे घेत आहेत.

Back to top button