नगरच्या पोरीच हुश्शारऽऽऽऽऽ! | पुढारी

नगरच्या पोरीच हुश्शारऽऽऽऽऽ!

नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 12 वीच्या निकालात नगर जिल्ह्याचा 94.41 टक्के निकाल लागला. दरम्यान, पुणे विभागात सोलापूर प्रथम, तर नगरने पुण्याला मागे टाकत दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा पुन्हा एकदा मुलीचं हुश्शार ठरल्याचे निकालातून समोर आले.

कोरोनासंसर्गात गतवर्षी 12 वीची परीक्षा झालीच नाही. यंदा मात्र शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेत निकालाही वेळेत जाहीर केला. मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या 12 वीची परीक्षेच्या ऑनलाईन निकालात नगर जिल्ह्यातील 59,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी 94.41 इतकी असल्याचे समोर आले. 96 टक्के मुली, तर 92 टक्के मुले बारावी परीक्षेत पास झाली आहेत.

गुणवंत हरपले! बारावीत यंदा एकालाही 100 टक्के नाहीत

बुधवारी सकाळपासूनच 12 वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्कंठा लागली होती. कोरोनानंतर एक वर्षाने मुलांनी परीक्षा दिल्याने निकाल काय लागेल, या चिंतेने पालकही काहीसे अस्वस्थ होते. त्यामुळे ते देखील ऑनलाईन निकालाकडे डोळे लावून बसले होते. दुपारी 1 नंतर अधिकृत वेबसाईटवर हे निकाल पहायला मिळाले. त्यात नगरचा निकाल समाधानकारक असला तरी गतवर्षापेक्षा टक्केवारी घटली असल्याचे समोर आले.

जिल्ह्यातील 14 तालुक्यातून परीक्षा दिलेल्या 63 हजार विद्यार्थ्यांमध्ये 36407 मुलांनी परीक्षा दिली होती. त्यात 33757 मुले उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 92.71 इतकी आहेत. तर परीक्षा दिलेल्या 26597 पैकी 96.73 टक्के प्रमाणे 25729 मुलींनी बाजी मारत पुन्हा एकदा मुलीच हुश्शारऽऽऽऽऽ असल्याचे दाखवून दिले आहे.

शेवगाव अव्वल, श्रीरामपूरचा निकाल सर्वात कमी
निकालात शेवगाव तालुक्याचा 98.57 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा श्रीरामपूर तालुक्याचा आहे. श्रीरामपूरचा निकाल 86.76 टक्के लागला. याशिवाय, जामखेड, पारनेर, नेवासा तालुक्यांतील विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

624 ‘रिपीटर’ झाले उत्तीर्ण
गेल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणून परीक्षा दिली होती. अशाप्रकारे नगर जिल्ह्यातून विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचे पेपर दिले होते. 1198 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नगर ः 96.92 टक्के
परीक्षार्थी 9 हजार 768
उत्तीर्ण 9 हजार 467

राहाता ः 93.83 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 819
उत्तीर्ण 4 हजार 522

संगमनेर ः 94.03 टक्के
परीक्षार्थी 6 हजार 803
उत्तीर्ण 6 हजार 397

कर्जत ः 95.67 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 303
उत्तीर्ण 3 हजार 160

शेवगाव ः 98.58 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 571
उत्तीर्ण 4 हजार 506

राहुरी ः 90.24 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 5
उत्तीर्ण 2 हजार 712

पारनेर ः 97.88 टक्के
परीक्षार्थी 2 हजार 888
उत्तीर्ण 2 हजार 827

श्रीगोंदा ः 92.33 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 224
उत्तीर्ण 2 हजार 977

पाथर्डी ः 95.55 टक्के
परीक्षार्थी 5 हजार 351
उत्तीर्ण 5 हजार 113

जामखेड ः 97.51 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 104
उत्तीर्ण 3 हजार 027

नेवासा ः 95.51 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 389
उत्तीर्ण 4 हजार 193

कोपरगाव ः 89.03 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 57
उत्तीर्ण 3 हजार 612

अकोले ः 93.87 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 608
उत्तीर्ण 3 हजार 387

श्रीरामपूर ः 86.76 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 936
उत्तीर्ण 3 हजार 415

Back to top button