कालजयी सावरकर : सौरभ गोखले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत

कालजयी सावरकर
कालजयी सावरकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. (कालजयी सावरकर) हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. (कालजयी सावरकर)

लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेते मनोज जोशी, अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार यांच्या सहयोगी भूमिका आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news