dharmendra
dharmendra

अभिनेते धमेंद्र रुग्णालयात? बॉबी देओलचा मोठा खुलासा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याशी संबंधित मोठे वृत्त समोर आले होते. या वृत्तामध्ये म्हटले गेले की, धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक आहे. या दरम्यान, धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने प्रसारमाध्यमांशी बोलताना या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. बॉबी म्हणाला की, "ते एकदम ठीक आहे. ते घरी आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतकचं नाही तर असेही समजले की, त्यांची प्रकृती गंभीर आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर बॉबी देओलने वडील धमेंद्र यांची हेल्थ अपडेट मीडियाला दिली. या सर्व गोष्टी खोट्या असून अफवा पसरवण्यात आल्याचे म्हटले आहे.

धर्मेंद्र यांचे वृत्त पाहिल्यानंतर नेचकरी सोशल मीडियावर ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करू लागले. बॉबी देओलने अफवांचं खंडन केल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडलाय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news