हिंगोली : अवैध देशी दारू विक्रत्यांवर आखाडा बाळापूर पोलिसांची कारवाई | पुढारी

हिंगोली : अवैध देशी दारू विक्रत्यांवर आखाडा बाळापूर पोलिसांची कारवाई

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा
आखाडा बाळापूर ते रूद्रवडी रस्त्यावर पवित्रेशवर गॅस एजन्सीजवळ पोलिसांनी छापा टाकून देशी भिंगरी, संत्रा दारू व दुचाकी असे 43 हजार 448 रुपयाचा माल जप्त केला. तर सिंदगी येथे 100 लिटर हातभट्टी दारू गाळपाचे रसायन ,मोहफुले किंमत 10 हजार रुपयांचा  मुदेमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रत्यांचे धाबे दणाणले आहेत.

बाळापूर ते रूद्रवाडी रस्त्यावर पवित्रेश्र्वर गॅस एजन्सीजवळ आरोपी नामदेव देवराव खुडे( वय-47) व वैजनाथ मधुकर बावगे (वय29) दोघेही रा. पोतरा हे दोघांना ताब्यात घेत दुचाकी डिस्कव्हर (MHR- 6783) जप्त करण्यात आली आहे. तर सिंदगी येथील किशन पूर्भाजी अंभोरे याचेकडून हातभट्टी दारूचे रसायन व मोहफुळे असा १० हजार रुपयाचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी.सी.बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर नांगरे, पी. चव्हान यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

 

Back to top button