जळगाव: चोपड्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद | पुढारी

जळगाव: चोपड्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दरोड्याच्या प्रयत्नात असलेली गुन्हेगारांच्या टोळीला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुलसह १७ काडतूस असे एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र खोर्गे (२४), जिजाबा फाळके (३९), चांदपाशा शेख (३२), जयेश भुरूक (२४ ) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपीचे नावे आहेत. तर सतनामसिंग जुनैजा हा पाचवा आरोपी पसार झाला आहे.  रविवारी (दि. ४) चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लासुर ते सत्रासने मार्गावरील उत्तमनगर गावाच्या अलीकडे असलेल्या घाटात रात्रीच्या सुमारास धाक दाखवून दहशतीने दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेले चार आरोपी आढळून आले. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुलसह १७ काडतूस हस्तगत करण्यात आले. तर सतनामसिंग जुनैजा यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत पळ काढला. जुनैजा याने अटकेतील आरोपींना दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्राणघातक शस्त्रे विक्री केली व दरोडा टाकण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्सटेबल मनोज दुसाने यांच्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button