पुढारी ऑनलाईन डेस्क: इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी अर्थात आयफा (IIFA २०२२) पुरस्कार सोहळा अबूधाबी येथे उत्साहात पार पडला. बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि क्रिती सेनॉन यांच्यासह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने IIFA Awards 2022 या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. तर काही बॉलिवूड स्टार्सनी आपल्या सौदर्याचा जलवा ग्रीन कॉर्पेटवर दाखविली.
आयफा (IIFA २०२२) पुरस्कार सोहळाचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेहरशाह' चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. 'सरदार उधम' या चित्रपटासाठी अभिनेता विक्की कौशल सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 'मिमी' या चित्रपटासाठी अभिनेती क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं.
'मिमी' या चित्रपटासाठी मराठी अभिनेती सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्कार मिळाला. तर 'शेहरशाह' चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णु वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. याशिवाय या सोहळ्यात अनेकांना आयफा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, विक्की कौशल, सारा अली खान, सई ताम्हणकर, संजय गगनानी, पूनम प्रीत, रतन लंबियां, नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस, एरिका फर्नांडिस, राखी सावंत, अनन्या पांडे, अमिता अग्रवाल, नर्गिस फाखरी यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी आयफामध्ये हजेरी लावली होती.
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विष्णु वर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्की कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (ल्युडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता – अहान शेट्टी (अहान शेट्टी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – शर्वरी वाघ (बंटी और बबली २)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – जुबिन नौटियाल रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – असीस कौर, रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत – ए आर रहमान (अतरंगी रे),
तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोसे, बी प्राक, जानी (शेहरशाह)
( video ; viralbhayani instagram वरून साभार)