IIFA 2022 : 'आयफा'मधील लूकने ऐश्वर्या रॉय झाली ट्रोल; 'प्रत्येक वेळी तोच...' | पुढारी

IIFA 2022 : 'आयफा'मधील लूकने ऐश्वर्या रॉय झाली ट्रोल; 'प्रत्येक वेळी तोच...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयफा पुरस्कार सोहळा (IIFA 2022 ) नुकताच अबुधाबीमध्ये पार पडत आहे. अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडच्या एकाहून एक अभिनेत्रींनी आपल्या सौदर्यांचा जलवा ग्रीन कॉर्पेटवरह दाखविला. या सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या रॉयही तिचा पती अभिषेक बच्चनसोबत पोहोचली; परंतु, या सोहळ्यात ऐश्वर्याच्या लूकने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

ऐश्वर्या  पती अभिषेक बच्चनसोबत करण जोहरच्या बर्थडेनंतर अबूधाबी येथील आयफा अवॉर्ड्समध्ये (IIFA 2022 ) ग्रीन कार्पेटवर दिसली. या सोहळ्यात दोघांनी ब्लॅक रंगाची कपडे परिधान केली होती. यावेळी खास करून, ऐश्वर्या सोनेरी आणि बहु-रंगीत फुलांची डिझाईन असलेल्या ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये तर अभिषेक ब्लॅक रंगाचा कोट आणि जीन्समध्ये दिसला. यावेळी मोकळ्या केसांसह मेकअपने तिने आपला लूक पूर्ण केला होता. परंतु, ऐश्वर्याचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला नाही.

आयफा अवॉर्ड 2022 मधील ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर होताच चाहत्यांनी ऐश्वर्याला चांगलच ट्रोल केले. काही नेटकऱ्यानी तिला लूक आणि ड्रेसिंग सेन्स अजिबात नसल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ‘इफ्तार पार्टी नाही तर IIFA अवॉर्ड 2022 आहे’, ‘ड्रेसिंग सेन्स नाही’, ‘हेअरस्टाईल चांगली नाही’. ‘प्रत्येक वेळी तोच लूक’, यासारख्या अने कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

 

( video ; viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button