Amruta Khanvilkar : चंद्राचं लाजवाब सौंदर्य, कातील अदांनी केलं घायाळ | पुढारी

Amruta Khanvilkar : चंद्राचं लाजवाब सौंदर्य, कातील अदांनी केलं घायाळ

पुढारी ऑनलाईन डेस्क

चंद्रमुखीच्या चंद्राचा प्रकाश दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. चंद्रमुखीची अभिनेत्री अमृता खानविलकरचं (Amruta Khanvilkar) सौंदर्य म्हणजे व्वा क्या बात है. तिच्या प्रत्‍येक अदा घायाळ करणाऱ्या आहेत. म्हणूनच तर प्रेक्षक नेहमीचं तिच्या प्रेमात पडतात. आता अमृताने सुंदर फोटोशूट केलं आहे. खाली दिले फोटो मिस करून नका. पाहाचं. (Amruta Khanvilkar)

अमृता खानविलकरचा चंदमुखी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाती तिच्यासोबत आदिनाथ कोठारे मुख्‍य भूमिकेत आहे. तिने चंद्राची भूमिका साकारलीय. या चित्रपटातील गाणी चांगलीच गाजली. या चित्रपटातील तिचे नृत्य, सौंदर्य, वेशभूषा, अदा सर्वचं काही वाखाणण्याजोगे आहे.

पांढऱ्या साडीत देखणी अमृता

अमृताने पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीत फाेटोशूट केलं आहेत. मोकळे केस, लाईट मेकअपमध्ये तिचं सौंदर्य आणखी बहरत आहे. तिने एका मागोमग फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने साडी कोणत्या प्रकारची आहे, याविषयी माहिती दिलीय. ऑरा बनारस साडी नेसून तिने आपल्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.

अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी चित्रपटातील  चंद्रा  हे गाणं साेशल मीडियावर  धुमाकूळ घालत आहे. अमृता खानविलकरच्या दमदार लावणी परफॉर्मन्स आणि श्रेया घोषालच्या सुरेल आवाजाचा जादू फॅन्सवर झालीय. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.

या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर आता अमृताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अमृताने देवदर्शनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती देवदर्शन करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणताना दिसते, लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूर येथे यायची सवय आहे …. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय.

चंद्रमुखी release झाला ….. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं …. आज फक्त आभार मानायला आले.  बाकी काहीच नाही. #tuljapur #aaibhavani #tumchichandra #amuminivlog.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Back to top button