shriya pilgaonkar : रंगबेरंगी ड्रेसमध्ये सचिनच्या कन्येचं फोटोशूट | पुढारी

shriya pilgaonkar : रंगबेरंगी ड्रेसमध्ये सचिनच्या कन्येचं फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क

अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकरचा  (shriya pilgaonkar) न्यू लूक समोर आला आहे. रंगबेरंगी कपड्यांमध्ये तिने फोटोशूट करून ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रिया आगामी वेब सीरीज द ब्रोकन न्यूजमध्ये दिसणार आहे. या सीरीजच्या ट्रेलर रिलीज प्रसंगी तिने या सीरीजमधील कलाकारांसह हजेरी लावली. या ट्रेलर लॉन्चप्रसंगी तिने फोटोशूट केले. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रेसोबतही सेल्फी आणि फोटोज शेअर केले आहेत. त्याचशिवाय, तिने एक स्वत:चा व्हिडीओ अपलोड केला आहे. (shriya pilgaonkar)

सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर स्टारर द ब्रोकन न्यूज वेब सीरीज लवकरच भेटीला येणार आहे. बॉलिवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री सोनाली बेंद्रेला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘द ब्रोकन न्यूज’ खूप दिवसांपासून चर्चेत होती ‘द ब्रोकन न्यूज’चा ट्रेलर जोरदार धमाका करणारा आहे.या मालिकेत सोनाली, जयदीप आणि श्रिया यांच्यासह तारुक रैना, इंद्रनील सेनगुप्ता, फैसल रशीद, किरण कुमार, आकाश खुराना आणि संजिता भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

काय आहे कथा?

ब्रोकन न्यूज मालिका दोन प्रतिस्पर्धी न्यूज नेटवर्क्सभोवती फिरते आणि पत्रकारांच्या गतिशील गटाचे जीवन,  प्रेम आणि संघर्ष उलगडते. आवाज भारती, एक स्वतंत्र, नैतिक वृत्तवाहिनी, मुख्य संपादक अमिना कुरेशी (सोनाली बेंद्रे) आणि जोश 24/7 न्यूज, मुख्य संपादक दिपंकर सन्याल (जयदीप अहलावत) यांच्या नेतृत्वाखाली आहे. टीआरपीनुसार भारतातील नंबर 1 न्यूज चॅनेल, परंतु सनसनाटी आणि आक्रमक पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. या दोन टोकाच्या पात्रांमध्ये राधा भार्गव (श्रिया पिळगावकर) आहे, जी नैतिक पत्रकारितेवर विश्वास ठेवते, परंतु तिच्यावर येणाऱ्या बंधनांमुळे निराश होते.

ट्रेलरमध्ये दिसून येते की, ‘द ब्रोकन न्यूज’ ही या दोन भिन्न जगांच्या संघर्षाची, त्यांच्या भिन्न विचारधारा आणि त्यांच्या विसंगत नैतिकतेची कथा आहे. आपल्या दैनंदिन बातम्यांमागील खऱ्या कथेची ही झलक आहे – व्यवसाय आणि त्याचे राजकारण आणि पडद्यामागील सत्य, जिथे सर्व पत्रकार ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्याच्या कधीही न संपणाऱ्या दबावात काम, महत्त्वाकांक्षा आणि सचोटीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Back to top button