कोण आहे नताशा स्टॅनकोविक? जिच्यावर हार्दिक पांड्या झाला लट्टू | पुढारी

कोण आहे नताशा स्टॅनकोविक? जिच्यावर हार्दिक पांड्या झाला लट्टू

पुढारी ऑनलाईन डेस्क

गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या हंगामातच आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सला हरवून गुजरातच्या टीमने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा किताब आपल्या नावे केला. गोलदाजी करणाऱ्याने राजस्थान रॉयल्सला केवळ १३० धावांवर रोखलं. यानंतर टायटन्सने सात विकेट आणि जवळपास दोन ओवर बाकी असताना सामना जिंकला. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पती हार्दिकच्या विजयावर भावूक झाली आहे. तिचे मैदानातील फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसताहेत. तुम्हाला माहितीये का, एक मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नताशा स्टॅनकोविक हिच्यावर हार्दिक पांड्या लट्टू झाला तरी कसा?

ऑलराउंडर हार्दिक पांड्या आयपीएल जिंकल्यानंतर हसत होता. दरम्यान, नताशा मैदानावर आली आणि हार्दिक पांड्याची गळाभेट घेतली. यावेळी तिच्या डोळ्यांतून अश्रू येताना दिसले. ती खूप भावूक झाली. दरम्यान, हार्दिक तिला सांभाळताना दिसला.

कोण आहे नताशा?

‘सत्याग्रह’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांचा होता. नताशा ही सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. भारतात तिला बिग बॉसच्या ८व्या सीझन आणि ‘बादशाह’मधील ‘डीजे वाले बाबू’ या गाण्याने लोकप्रियता मिळाली.

२०१२ मध्ये भारतात आली

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नताशा २०१२ मध्ये भारतात आली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांसारख्या ब्रँडसह तिने मॉडेल म्हणून सुरुवात केली. २०१३ मध्ये ‘या’ सर्बियन मॉडेलला सत्याग्रह या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात नताशाने ‘आयो जी’ हा आयटम नंबर केला होता.

बिग बॉसमधून ओळख मिळाली

यानंतर, २०१४ मध्ये, स्टॅनकोविचला प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या म्युझिक व्हिडिओ ‘गन’ मध्ये भूमिका मिळाली. त्याच वर्षी तिला टीव्हीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या घरात महिनाभर राहण्याची संधी मिळाली. मात्र, या अभिनेत्रीने बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या ब्लॉकबस्टर गाण्याने देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवली.

दोन वर्षांनंतर, म्हणजेच २०१६ मध्ये, नताशाला सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘७ अवर्स टू गो’ मध्ये महिला पोलिसाची भूमिका देण्यात आली. २०१७ मध्ये तिने ‘फुक्रे रिटर्न्स’मध्ये ‘मेहबूबा’ डान्स नंबर केला. ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. नंतर तिला सुपरस्टार शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘झिरो’ मध्ये छोटी भूमिका मिळाली.

‘नच बलिये’ मध्ये धमाल

नताशा गेल्या वर्षी आलेल्या ‘द हॉलिडे’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती. रिअॅलिटी डान्स शो ‘नच बलिए’मध्ये नताशा तिचा पार्टनर अली गोनीसोबत डान्स करतानाही दिसली होती.

हार्दिकने नताशासोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करून नात्याची कबुली दिली होती. नंतर दोघांनी लग्न केले. साखरपुड्याचे खूप सुंदर आणि रोमँटिक फोटोदेखील हार्दिकने शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button