shaunk sen : कोण आहे शौनक, ज्याने कान्समध्ये जिंकला गोल्डन आय ॲवॉर्ड | पुढारी

shaunk sen : कोण आहे शौनक, ज्याने कान्समध्ये जिंकला गोल्डन आय ॲवॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये दिल्लीचा रहिवासी शौनक सेनने (shaunk sen) कान्समध्ये तब्बल ४ लाख रुपये जिंकले आहेत. शौनक सेनच्या ऑल दॅट ब्रीदस या माहितीपटाने शनिवारी (२८ मे) सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा L’Oil D’Or पुरस्कार जिंकला. या पुरस्काराला गोल्डन आय ॲवॉर्ड असेही म्हणतात. शौनक सेन चित्रपट दिग्दर्शक आहे. त्यांनी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. (shaunk sen)

‘ऑल दॅट ब्रेथ्स’ ची कथा

ऑल दॅट ब्रेथ्स दिल्लीतील दोन भावांची कथा सांगतात जे जखमी पक्ष्यांवर, विशेषतः गरुडांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवतात. गरुड दिल्लीपासून कसे दूर जात आहेत आणि पर्यावरण प्रदूषणाचा त्यांच्यावर कसा वाईट परिणाम होत आहे, हे माहितीपटात दाखवण्यात आले आहे.

सव्वा चार लाखांचे बक्षीस

८८ मिनिटांच्या या माहितीपटाने ज्युरी खूप प्रभावित झाले. गोल्डन आय ॲवॉर्ड जिंकणारा शौनक सेन दुसरा भारतीय आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार पायल कपाडियाच्या ‘अ नाईट ऑफ नोइंग नथिंग’ या माहितीपटाने जिंकला होता. शौनक सेनला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार म्हणून ५ हजार युरो (जवळपास ४.१६ लाख रुपये) देण्यात आले.

वडिलांना समर्पित चित्रपट

शौनकच्या ऑल दॅट ब्रीदसने या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकला. हा चित्रपट शौनक सेन यांनी त्यांच्या वडिलांना समर्पित केला आहे. त्याच्या वडिलांचे जुलै २०२१ मध्ये निधन झाले. २०१९ मध्ये या चित्रपटावर काम सुरू झाले. शौनकने २०१६ मध्ये सिटी ऑफ स्लीप या माहितीपटाद्वारे पदार्पण केले. जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्येही त्याचे कौतुक झाले. कान्स फिल्म फेस्टिव्हल फॉर ऑल दॅट ब्रेथ्समध्ये गोल्डन आय ॲवॉर्ड जिंकल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शौनक सेनचे अभिनंदन केले आहे.

कोण आहे शौनक सेन?

शौनक सेन दिल्लीतील दिग्दर्शक, व्हिडिओ आर्टिस्ट आणि सिनेमा स्कॉलर आहे. तो सध्या जेएनयूमधून पीएचडी करत आहे. शौनकने २०१६ मध्ये ‘सिटीज ऑफ स्लीप’ या माहितीपटाद्वारे पदार्पण केले. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, तैवान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यासह जगभरातील इतर अनेक ठिकाणी तो दाखवण्यात आला. शौनक एक शैक्षणिक लेखक आहे. त्याला सोशल मीडिया फेलोशिप आणि फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया डॉक्युमेंटरी फिल्म फेलोशिपसह अनेक फेलोशिप देखील मिळाल्या आहेत.

Back to top button