हिंगोली : तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

हिंगोली : तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळखुटा येथे एका तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (रविवार) पहाटे ही घटना घडली. गजानन विश्वनाथ खंदारे (वय ३५) असे त्‍यांचे नाव आहे.

पिंपळखुटा येथे गजानन खंदारे हे त्यांची पत्नी व दोन मुलींसह राहत हाेते. उदरनिर्वाहासाठी वडिलांच्या अर्धा एकर शेतीत ते काम करत हाेते. मात्र यातून मिळणारे उत्‍पन्‍नातून घरखर्च निघत नसल्याने ते मजुरीचे काम करत असत. शेतीमधून उत्पन्न मिळत नसल्यामुळे गजानन हे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.

मजुरी करूनही कुटुंबाचा घरखर्च भागवणे कठीण झाले होते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आज पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार घरातील इतर कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनेची माहिती शेजार्‍यांना दिली. त्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमनवार, उपनिरीक्षक सुरेश भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली. .

हेही वाचलंत का?  

Back to top button