Samantha Ruth Prabhu : सामंथाने ट्रोलर्सला सुनावले, "मी जर पाळीव प्राण्यासोबत मेले...." | पुढारी

Samantha Ruth Prabhu : सामंथाने ट्रोलर्सला सुनावले, "मी जर पाळीव प्राण्यासोबत मेले...."

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ क्वीन अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) हिने काही महिन्‍यांपूर्वी पती, अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आली होती. यानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सामंथाने सडेतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोटादरम्यान सामंथा जोरदार चर्चेत आली होती. नुकतेच तिने पाळीव कुत्र्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिला ‘कुत्रे आणि मांजरींसह एकटीच मरणार तू.’ असे म्हणत ट्रोल केले होते.

यावर सध्या सामंथाने ( Samantha Ruth Prabhu ) सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. सामंथाने म्‍हटलं की, “मी जर पाळीव प्राण्यासोबत मेले तर, मी स्वतः ला भाग्यवान समजेन.” या उत्तराने ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट तत्‍काळ  डिलीट केले.

याआधीही सामंथाला ट्रोलर्संनी अनेक प्रश्न विचारले होते. यात एका नेटकऱ्याने तिला ‘Have you reproduced because I wanna reproduce you’ हा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना समंथा म्हणाली, ‘आधी reproduce हा शब्द वाक्यामध्ये कसा लिहायचा हे गूगलवर सर्च करा आणि मग प्रश्न विचार’. असे म्हटले होते.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिला ‘तुला चित्रपटाचे दिग्दर्शन करायला आवडेल का?’ हा प्रश्न विचारताच ‘आत्ताच याबद्दल काही सांगू शकत नाही.’ असे ती म्हणाली.

‘तु बरी आहेस का?’ यासारखे अनेक प्रश्न चाहते सामंथाला विचारत असतात.सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यने गोव्यात २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडप्यांच्या यादीत त्‍यांचा समावेश होता. २ ऑक्टोबर २०२१ रोजी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला हाेता.

हेही वाचलंत का? 

Back to top button