सकारात्मकतेकडे वाटचाल ! ओतूरच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव | पुढारी

सकारात्मकतेकडे वाटचाल ! ओतूरच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

ओतूर (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीची दि. 1 मे ची स्थगित झालेली ग्रामसभा शुक्रवारी (दि. 27) ग्रामसचिवालयाच्या इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी डुक्करमुक्त गाव व विधवा प्रथा कायमची बंद करण्याचा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच गीता पानसरे होत्या. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला ‘डुक्करमुक्त गाव’चा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे आणि डॉ. अमित काशीद यांनी उपस्थित केला.

त्यास ग्रामसभेने एकमताने मान्यता देऊन ठराव मंजूर केला. तसेच संबंधित डुक्कर मालकांनीही दि. 30 तारखेपर्यंत डुक्करमुक्त गाव करण्यास संमती दिली. सभेत नगरवेशीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालील स्लॅब जीर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जुने बसस्थानक चौकात नव्याने पूर्णाकृती पुतळा उभारण्याचाही ठराव करण्यात आला.

नांदेड : जागेच्या वादातून महिलेस जिवंत जाळले; बांगड्यांमुळे खुनाचे गूढ उकलले

तसेच गावात विधवा प्रथा कायमची बंद करण्याचा, जुना डोमेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत, ग्रामीण रुग्णालय डोमेवाडी रस्त्यालगतची संरक्षक भिंत यावर सखोल चर्चा होऊन ठराव करण्यात आला. माजी सभापती विशाल तांबे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, माजी उपसरपंच प्रेमानंद अस्वार, ग्रामपंचायत सदस्य संकेत फापाळे, बाजार समितीचे माजी संचालक भगवान तांबे, धोंडिभाऊ मोरे, देविदासनाना तांबे, रामदास तांबे, उल्हास तांबे, विवेक पानसरे, सोनल डुंबरे या मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून जमावबंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Back to top button