नाशिकच्या नांदगाव मध्ये तब्बल 10 मोर मृतावस्थेत आढळले, वनविभागात खळबळ | पुढारी

नाशिकच्या नांदगाव मध्ये तब्बल 10 मोर मृतावस्थेत आढळले, वनविभागात खळबळ

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा ; नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  मृतांमध्ये ४ नर व ६ माद्यांचा समावेश आहे. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आमोदे येथील खाजगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही माहिती वनविभागाला कऴविण्यात आली. वन विभागाचे आर. एफ. ओ चंद्रकांत कासार, वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन. के. राठोड, आर. के. दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. या मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. मृत्य झालेल्यांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शेवविच्छेदन करण्यासाठी वेहळगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असता अन्नातून विषबाधा झाल्याने मोरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त डॉक्टरांनी व्यक्त केला.

शवविच्छेदन केले असता सर्वच मोरांच्या शरीरात ज्वारीची दाने आढळले. ज्वारीवर औषध फवारणी केलेली असावी. सर्व मोरांना अन्नातून विषबाधा झाली असावी. त्यात मोरांचा लिवर फेल झाल्याने मृत्यू झाला असावा. अशी माहिती पशुवैद्यकिय अधिकारी न्यायडोंगरी यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button