Rupali Bhosale : व्हाईट साडीत दिसली चाँद परी ❤️ | पुढारी

Rupali Bhosale : व्हाईट साडीत दिसली चाँद परी ❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क

आई कुठे काय करते या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मराठमोळी रुपाली भोसलेच्या नखरेल अदा पाहायला मिळताहेत. तिने इन्स्टाग्रामवर तिने तिच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. व्हाईट कलरच्या साडीमध्ये रुपालीचा कल्चरल लूक पाहायला मिळतोय.

तिने हेअरस्टाईल करून केसांचा अंबाडा घातलेला दिसतोय. वनसाईड पदर सोडून साडीला साजेसे दागिनेही घातलेले दिसताहेत. त्याचबरोबर सुंदर मेकअपदेखील केलेला दिसतो. एका मागोमाग एक फोटो तिने शेअर केले आहेत. एका फोटोला तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की- Can’t post few and keep the rest 🤍, दुसऱ्या फोटोला म्हटलंय की- For the love of White 🤍❤️ , आणखी एका फोटोला कॅप्शन लिहिलीय-‘ Not all who wander are lost 🤍❤️ ‘. चौथ्या कॅप्शनला म्हटलं आहे की-If time were a color, I bet it would be a tasteful Off – White.

यासोबतचं तिने तीन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने संजना ही व्यक्तीरेखा साकारलीय. मालिकेत खलनायिकेच्या जवळपास जाणारी तिची व्यक्तीरेखा कौतकास्पद आहे. अभिनयाइतकचं तिचा अभिनयदेखील सुंदर आहे. जितकी ती मालिकेत सुंदर दिसते तितकीच ती खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील सुंदर आहे. तिची संजनाची भूमिका वाखाणण्याजोगे ठरतेय. अभिनेत्री रुपाली भोसले हिचं देखील या मालिकेतील अभिनयासाठी कौतुक होताना दिसतं.

रुपाली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती नेहमीचं आपल्या चाहत्यांसाठी आपले अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. तिच्या व्हिडिओवर आणि फोटोंवर चाहत्यांकडून उड्या पडतात. लाईक्स आणि कमेंट्सने तिचे इन्स्टाग्राम भरून गेले आहे.

Back to top button