Metaverse : मेटाव्हर्समध्ये महिला युजर्सचा लैंगिक छळ

metaverse
metaverse
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मेटाव्हर्सच्या एका प्लॅटफॉर्ममध्ये एका २१ वर्षीय महिला अवतारवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. Horizon Worlds असे या प्लॅटफॉर्मचे नाव आहे.

पीडित महिला SumOfUS या संस्थेसाठी काम करते. "मेटाव्हर्ससाठी अशा प्रकारचे धोके टाळण्यासाठी अधिक काम करावे लागणार आहे, हेच या घटनेने दाखवून दिले आहे," असे SunOfUs या संस्थेने म्हटले आहे.

तर Horizon Worlds ने म्हटले आहे की, "आमच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षेसाठीचे टुल्स आहेत. त्याचा वापरकर्त्यांनी उपयोग केला पाहिजे. सर्वांनाची सुरक्षेच्या उपयांचे पालन करून आम्हाला या प्रकारात तपास करण्यासाठी मदत करावी." या संदर्भातील बातमी BBCने केली आहे.

या प्लॅटफॉर्म सध्या अमेरिका आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. यातील अवरतासाठी कार्टुनसारखे सोपे सुटसुटीत स्वरुप देण्यात आले आहे.

SumOfUs म्हटले आहे की व्हर्च्युअल अघातही फार वेदनादायी असू शकतात याचा खऱ्या जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
बीबीसीकडे या लैंगिक अत्याताचारे रेकॉर्डिंगही आहे. यामध्ये या महिलेच्या रूममध्ये दोन पुरुष अवतार दिसता. एक अवतार दूरवर उभा आहे, तर एक अवतार महिलेच्या जवळ उभा असून तो अक्षेपार्ह बोलत असल्याचे दिसते.

यापूर्वीही अशा घटना घडल्यानंतर मेटाव्हर्समध्ये सीमेची मर्यादा घालण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या अवतारच्या फार जवळ जाता येत नाही.

पण मेटाव्हर्सची योग्य अशी व्याख्या बनलेली नसल्याने, त्याला कोणते निर्बंध आखून द्यायचे हे ठरवताना अडचणी येत आहेत.
SumOfUs ग्रुपच्या विकी वॅट यांच्या मते, "मेटा या कंपनीने गडबडीत मेटाव्हर्सची निर्मिती न करता त्यातील धोक्यांची नीट पाहाणी करून त्यावर उपाययोजना कराव्यात. आपल्या प्लॅटफॉर्मवर जे घडत आहे, ते तुम्ही नियंत्रणातही ठेऊ शकत नाही, त्याकडे लक्ष द्या असे आम्ही म्हणत आहोत."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news