farnaz shetty : ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ची मस्तानी आहे तरी कोण? | पुढारी

farnaz shetty : 'काशीबाई बाजीराव बल्लाळ'ची मस्तानी आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क

काशीबाई बाजीराव बल्लाळ (farnaz shetty) या टीव्हीवरील हिंदी मालिकेने अल्पावधीतचं लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेत मस्तानीने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. तुम्हाला माहितीये का, ही मस्तानी आहे तरी कोण? तिच्याविषयी जाणून घ्या, या खास रंजक गोष्टी. (farnaz shetty)

फरनाज शेट्टी हिची काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेत एन्ट्री झालीय. तिला पाहताचं प्रेक्षक तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. जितकी ती सुंदर दिसतेय, तितकी ती रिअल लाईफमध्येही सुंदर दिसतेय. तिच्याविषयी जाणून घेऊया ही माहिती.

टीव्ही शो ‘एक वीर की अरदास – वीरा’ मध्ये गुंजन सिंहची भूमिका साकारून फरनाज प्रसिध्दीच्या झोतात आली. फरनाज शेट्टी आता खूप बोल्ड झाली आहे. ती आपल्या फॅन्सना आपल्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफविषयी अपडेट देत असते.

इतकचं नाही तर फरनाजने साउथ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये तेलुगु चित्रपट ‘इन्दुवदना’ साईन केलाय. हा चित्रपट लवकरच रिलीज होईल. २०१९ मध्ये फरनाज चित्रपटाकडे वळली. ती ‘बटालियन ६०९’ मध्ये बिजलीच्या भूमिकेत दिसली होती.

याशिवाय तिने ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘लाल इश्क’ आणि ‘फियर फाईल्स’ यासारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. टीव्ही शोज ‘वारिस’मध्ये मनप्रीत पवनिया, ‘कहां हम कहां तुम में’ रायमा सेनगुप्ता आणि ‘सिद्धी विनायक’ मध्ये सिद्धी जोशी/ रिद्धि सिन्हाच्या भूमिकेने तिचे करिअर उंचावत गेले. ‘एक वीर की अरदास – वीरा’ मध्ये गुंजन सिंहची भूमिका साकारून फरनाजने प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली खास ओळख निर्माण केली.

‘दिल की नजर से खूबसूरत’ नंतर फरनाजने प्रसिद्ध शो ‘बालिका वधू’मध्ये कंचनच्या भूमिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण केली. फरनाज शेट्टीने पहिल्यांदा २०१३ मध्ये सोनी टीव्हीवर प्रसारित झालेली मालिका ‘दिल की नजर से खूबसूरत’ मध्ये टीयाची भूमिका साकारली होती.

आईच्या सांगण्यावरून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. फरनाजने नुकतेच आपले काही सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अन्य कलाकारांप्रमाणेच फरनाजदेखील आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करते. अनेक वर्षे टिव्ही इंडस्ट्रीत ती आपले नाव कमावत आहे.

टीव्ही शो ‘एक वीर की अरदास – वीरा’मध्ये गुंजन सिंहची भूमिका साकारलेली फरनाज शेट्टी आता खूप बोल्ड झालीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farnaz Shetty (@farnazshetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farnaz Shetty (@farnazshetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farnaz Shetty (@farnazshetty)

Back to top button