Panchayat 2 : ‘विनोद’ आणि ‘बनारकस’ ची भूमिका करणारे कोण आहेत? | पुढारी

Panchayat 2 : 'विनोद' आणि 'बनारकस' ची भूमिका करणारे कोण आहेत?

पुढारी ऑनलाईन डेस्क

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होताच पंचायत २ ही (Panchayat 2) वेब सीरिज सुपरहिट झाली आहे. प्रत्येक पात्र स्वतःहून वेगळे आहे. फुलेरा पंचायतीच्या प्रमुखापासून ते पंचायत सचिवापर्यंत सर्वांनाच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. पण, मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये विनोद, बनारकस अशी काही नवीन पात्रंही जोडली गेली. या दोन्ही पात्रांनी लोकांना खूप हसवले आणि तसाच रागही आला. विनोदचे बोलणे ऐकून लोकांना हसायला भाग पाडले जात असतानाच या मालिकेतील खलनायकावर लोक संतापले. तुम्‍हाला माहितीये का, विनोद आणि बनारकस आहेत तरी कोण? (Panchayat 2)

कोण आहे विनोद उर्फ अशोक पाठक

अभिनेते अशोक पाठक यांनी विनोदची भूमिका साकारली आहे. पंचायत-२ मधील विनोदची डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमेडी स्टाईल लोकांना खूप आवडली. विनोदचे मीम्स आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशोक कुमार गेल्या ११ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत.

‘विनोद’ कापूस विकायचा

अभिनेता अशोक पाठक हा बिहारच्या सिवानचा रहिवासी असून तो ९वीत असताना काकासोबत फरीदाबादला आला होता. येथे दुर्गेश काकासोबत कापूस विकायचा. कसेबसे बारावी पूर्ण केली आणि मग अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. बिट्टू बॉसमधून या अभिनेत्याने करिअरची सुरुवात केली होती. अशोक पाठक यांनी फुक्रे रिटर्न्स, खानदानी शफाखाना, सेक्रेड गेम्स, आर्या यांसारख्या मालिका-चित्रपटांमध्ये साईड रोल केले आहेत. पण पंचायत २ ने त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले.

दुर्गेश कुमार उर्फ ​बनारकस हा या मालिकेचा खलनायक आहे. वेबसिरीजमध्ये खलनायकालाही स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत ‘बनारकस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भूषणची भूमिका अशोक पाठक यांनी साकारली आहे. भूषणला पाहून लोक त्याच्यावर खूप चिडले. पण मजाही आली. दुर्गेशचा अभिनयात येण्याचा कोणताही विचार नव्हता, त्याला थेट अभ्यास करून नोकरी करायची होती.

इंजिनिअर व्हायला आलो, अभिनेता झालो

दुर्गेश कुमार हा इंजिनीअरिंगच्या तयारीसाठी दिल्लीत आला होता. येथे दोन-तीन परीक्षा देऊनही त्यांचे नाव एकाही महाविद्यालयात आले नाही. यानंतर त्यांच्या भावाने त्यांना थिएटर करण्यास सांगितले. नाट्यक्षेत्रात खूप साथ मिळाली आणि त्यांनी एनएसडीमध्येही रंगभूमी केली. दुर्गेश कुमारने आपल्या करिअरची सुरुवात इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये साईड भूमिकेमध्ये दिसला.

Back to top button