नाशिक : ‘पूनद’चे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल

नाशिक : ‘पूनद’चे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
शहरासाठी महत्त्वाकांक्षी असणार्‍या पुनद प्रकल्पाचे पाणी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले असून, ताशी दीड लाख लिटर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पडत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. त्यांनी सहकार्‍यांसह जुन्या जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली.

मागील दोन वर्षांपासून पुनद पाणी योजनेचे काम सुरू आहे. दरम्यान, कोविड -19 मुळे कामगार उपलब्ध न झाल्यामुळे काम संथगतीने सुरू होते. शहराच्या पुढील 50 वर्षांचे गणित नजरेसमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व स्त्रोतांमधून कमी पाणी उपलब्ध होत असल्याने नगरपालिकेने तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. दरम्यान, पुनद धरणातून पाणी उचलण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी माजी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता खेडेकर व कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांची भेट घेऊन पुनद धरणातून तत्काळ करार करून पाणी उचलू द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सर्व बाबींची पूर्तता करून झाल्याने तीन दिवसांपासून पुनद धरणातील पाणी शहरातील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहराला आता पाणीटंचाई भासणार नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या नवीन पाणीयोजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील जुन्या गावात नवीन जलवाहिनी टाकण्याचे आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच पुनद धरणावर जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात येत असून, तेदेखील लवकरच कार्यान्वित होेणार आहे. पुनद प्रकल्पामधून पाणी आल्यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे नियमित व कायमस्वरूपी पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. यावेळी याचिकाकर्ते अ‍ॅड. दीपक सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, महेश देवरे, मनोहर देवरे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे, नाना मोरकर, विलास दंडगव्हाळ, पवन सांगळे, वैभव गांगुर्डे आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी नितीन बागूल, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संजय सोनवणे, प्रकल्प समन्वक राहुल सूर्यवंशी हे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी परिश्रम घेत
आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news