व्हायरल व्हिडीओ : हाथों में हात डाले…हृतिक रोशन आणि गर्लंफ्रेंड सबा आझाद दिसले करणच्या पार्टीत

Saba Azad With Hrithik Roshan at Karan Johar's party
Saba Azad With Hrithik Roshan at Karan Johar's party

पुढारी ऑनलाईन डेस्क : 
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सध्या बॉलिवूडमधील चर्चेतील हॉट कपल आहे. दोघांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूड रंगली आहे.हे दोघेही करण जौहरच्या बर्थ-डे पार्टीत (व्हायरल व्हिडीओ) अखंड प्रेम रंगात बुडालेले दिसले.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बॉलिवूड कपलला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

करण जौहरने नुकताच २५ मे ला आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी अनेक मोठे आणि प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स त्यांच्या या आनंदात सामील होताना दिसले होते. करणच्या बर्थडे बॅशमधील एक कपल असेही होते की, ज्यांनी सर्वाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. अर्थात ते कपल होते हृतिक रोशन आणि सबा आझाद.

करण जौहरच्या पार्टीत हृतिक आणि सबाने काळ्या पोशाखात दिमाखदार ग्रँड एन्ट्री (व्हायरल व्हिडीओ) केली. याप्रसंगी हे दोघेही आनंदाने हातात हात घालून फिरताना दिसले. एवढेच नाही तर पार्टी दरम्यान ते दोघेही वेगवेगळ्या पोज देताना देखील दिसले. पार्टीतील हेच फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहते म्हणत आहेत की, " त्यांना स्वतःला असे कोणीतरी पाहणारे पाहिजे. जसं हृतिक सबाला पाहतोय".

या कपलचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडिवर व्हायरल होत आहे. यामध्ये सबा आणि हृतिक पार्टीच्या रेड कार्पेटवर एकत्र फिरताना दिसत आहेत. या दोघांना एंट्रीवरच (व्हायरल व्हिडीओ) तुषार कपूर, अयान मुखर्जी तसेच इतर सेलिब्रेटीदेखील भेटतात. याप्रसंगी हृतिक रोशन सर्वांना सबाची ओळख करून देत आहे. हा व्हिडीओ पाहून हृतिक रोशन आणि गर्लंफ्रेंड सबा आझादचे चाहते खूपच खुश दिसत आहेत. यावर एका चाहत्याने म्हटले आहे की, 'हृतिक जेंटलमैन हैं. वो सबा को सबसे मिलवा रहे हैं और पार्टी में उन्हें भी सबके समान इम्पोर्टेंस दे रहे हैं.' तर एका चाहत्यांने म्हटले आहे 'वह दोनों साथ में कितने अच्छे लग रहे हैं.'

हृतिक रोशन आणि सबा आझाद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघांची पहिल्यांदा एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली होती. त्यानंतर दोघे डिनर डेट्सवर एकत्र दिसले होते, परंतु ते नेहमीच कॅमेऱ्यापासून लांब राहीले आहेत. सबा आणि हृतिकने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याला इंस्टाग्रामवर ऑफिशिअल केले आहे. या दोघांच्या रोम्यांटिक किस्स्यांने चाहते त्यांना खूपच पसंती देत आहेत. सबा आझाद ही हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिची चांगली फ्रेंडसुद्धा आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news