स्मिता पाटील यांचा बायोपिक करायचा आहे ः चित्रांगदा | पुढारी

स्मिता पाटील यांचा बायोपिक करायचा आहे ः चित्रांगदा

चित्रांगदा सिंह हिचा चेहरामोहरा बराचसा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासारखा आहे. तसे तिला अनेक लोक बोलूनही दाखवत असतात. स्वतः चित्रांगदालाही त्याची जाणीव असल्याने तिने एका मुलाखतीत आपल्याला स्मिता पाटील यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

सध्या ती अँथोलॉजी सीरिज ‘मॉडर्न लव्ह मुंबई’मुळे चर्चेत आहे. यामध्ये ती एका मध्यमवर्गीय महिलेच्या भूमिकेत आहे. तिने सांगितले की, मला सध्या कोणत्याच बायोपिकची ऑफर मिळालेली नाही. मात्र, मिळाली तर मी नक्कीच करेन. लोक नेहमीच माझी तुलना स्मिता पाटील यांच्याशी करतात. संधी मिळाली तर त्यांची भूमिका करण्याची माझी इच्छा आहे!

Back to top button