Sonalee Kulkarni :अप्सरा सोनाली कुलकर्णीने सासरी बनवला ‘हा’ पहिला पदार्थ | पुढारी

Sonalee Kulkarni :अप्सरा सोनाली कुलकर्णीने सासरी बनवला ‘हा’ पहिला पदार्थ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीतील (marathi film industry) अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या चाहत्यांना सतत सरप्राईज करत असते. ती नेहमी सोशल मीडिया माध्यमातून सतत ॲक्टीव्ह राहते. तसेच आपल्या विविध सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या दैनंदिनीचे काही ना काही फोटो पोस्ट करुन या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते. अशा पद्धतीने ती सतत काय काय करत आहे हे आपोआपच तिचे चाहते व फॉलोअर्सना समजते. शिवाय तिच्या प्रत्येक पोस्टला देखिल चांगला प्रतिसाद मिळत असतो. सध्या ती तिच्या सासरी अर्थात लंडनमध्ये असून तेथील तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

सध्या सोनाली कुलकर्णी  (Sonalee Kulkarni) सासरचा अनुभव घेत आहे. ती सध्या पतीच्या अर्थात कुणाल बेनोडेकर सोबत तिच्या सासरचा आनंद लुटत आहे. मागील आठवड्यात तिचा वाढदिवस झाला होता. तिचा वाढदिवस तिच्या सासरच्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाचा फोटो तिने इन्स्टावर शेअर केला होता. या फोटो सोनालीला तिची सासू औक्षण करताना दिसत होती. औक्षण आणि वाढदिवसाच्या माध्यमातून तिचे सासरच्यांनी एक प्रकारे स्वागतच केले होते. आता सासरच्यांनी इतकं केलं म्हटल्यावर त्यांना खूश तर करायला हवेच. तर सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी सोनलीने तांदळाची खीर केली आहे. या तांदळाच्या खीरीचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिने त्याला “सासरी केलेला पहिला पदार्थ : तांदळाची खीर” अशी कॅप्शन दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

फोटो मध्ये तिने नऊ वाट्यांमध्ये तांदळाची खीर भरली आहे. खीरीवरती मस्तपैकी काजू, बदाम, खारीक असा सुकामेवा टाकून त्याला सजवले आहे. दिसताना खीर अत्यंत पाढशी शुभ्र व सुंदर दिसत आहे. खीरीच्या दिसण्यावरुन तर सोनाली उत्तम सुगरण असावी असे तरी वाटत आहे. अर्थात अशा पद्धतीने सासरच्या मंडळींना तांदळाच्या खीरीद्वारे या अप्सरेने नक्कीच मन जिंकले असणार.

तांदळाच्या खीरीची गंमत (Sonalee Kulkarni)

सारच्या मंडळींना इम्प्रेस करण्यासाठी का असेना सोनालीने तादळाची खीर करण्याचा बेत आखला. तीने शेअर केलेल्या फोटो वरुन तर सासरची मंडळी अगदीच त्या खीरीच्या आणि अर्थात सोनालीच्या देखिल प्रेमात पडले असतील. अर्थात तिने शेअर केलेल्या फोटोवर चांगल्याच कमेंट पडल्या आहेत. सर्वांनी तिचे कौतुक केले आहे. पण एका चाहत्याने या फोटोतील अनोखी गंमत देखिल दाखवून दिली आहे. या फोटोत सोनलीने एका ट्रे मध्ये नऊ वाट्यांमध्ये खीर भरली आहे. मात्र, या सर्व वाट्या एक समान नाहीत. सहा वाट्या या छोट्या आहेत आणि तीन वाट्या या मोठ्या आहेत. तर या वाट्यांवरुन एक चाहता सोनालीला म्हणतो, “चला म्हणजे तुमच्याकडे पण सेम साईजचे कप नाहीत…सहा सेम आणि तीन वेगळे”, तर काहीनी “तिला खूप छान परदेशात जाऊन पण, आपली संस्कृती विसरला नाहीत” असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी किचन कल्लाकारमध्ये जाण्याची तयारी देखिल सुरु असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button