Mouni Roy : मौनीच्या ब्ल्यू शॉर्ट वन पीसमध्ये बोल्ड अदा व्हायरल | पुढारी

Mouni Roy : मौनीच्या ब्ल्यू शॉर्ट वन पीसमध्ये बोल्ड अदा व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni) टीव्हीच्या दुनियेत पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिची फॅशन स्टाईल नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न, मौनीचा (Mouni) प्रत्येक लूक लाईमलाईट मिळवतो. तिच्या प्रत्येक फोटो चाहत्यांची लक्ष वेधून घेतात. तिचा जबरदस्त लूक सगळ्यांना तिचं कौतुक करायला भाग पाडतो. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

मौनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ब्ल्यू कलरच्या डीप कट शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते. या फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर दिसत आहे. ड्रेससह, मॅचिंग हँडबॅग आणि फीदर टच दिला आहे. तसेच मोकळे केस आणि न्यूड मेकअपमुळे तिचा लूक पूर्ण झाला आहे. तिचा हा बोल्ड लूक पाहिल्यानंतर चाहते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

या ब्ल्यू बॉडीकॉन ड्रेसमधला मौनीचा लूक पार्टीसाठी परफेक्ट दिसत होता. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स आणि कौतुक करत आहेत. तिला प्रत्युत्तर देताना एका युजरने लिहिले की, “हा ड्रेस फक्त तुमच्यासाठी बनवला आहे, तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहात”.

दुसऱ्या एका चाहत्यानेही लिहिले, तुझा सुंदर पोशाख. मौनीच्या या पोस्टवर फायर इमोजीसह आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच एका डान्स रिअॅलिटी शोला जज करताना दिसली आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनी रॉय महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सध्या, रिलीजची तारीख उघड झाली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबर, २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button