

परभणी वृत्तसेवा : महेबूब फंक्शन हॉल (दर्गा रोड) पारवा गेट (जि. परभणी) येथे कलीम अन्सारी यांच्या मुलीचे लग्न होते. १५ मे रोजी सकाळी १0 वाजता लग्नाचा मुहूर्त होता. पण काही कारणावास्तव लग्न दुपारी १ वाजता झाले. लग्नानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. पण जेवणातील स्वीट शाही तुकडा या पदार्थातून विषबाधा झाल्याचे लक्षात आले.
काल रात्री १0 वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल, परभणी येथे ५७ जणांना उपचारासाठी आणण्यात आले. त्यातील एकाला सूर्य आयसीयू परभणी या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले आहे. सध्या सर्वांची आता सर्वांची प्रकृती ठीक आहे असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?