EPFO : आता पीएफ खात्याला ऑनलाइन जोडा नॉमिनीचे नाव, जाणून घ्या प्रक्रिया | पुढारी

EPFO : आता पीएफ खात्याला ऑनलाइन जोडा नॉमिनीचे नाव, जाणून घ्या प्रक्रिया

पुढारी डेस्क

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) च्या वेबसाइटवर लॉगइन करुन EPF खातेधारक आता आपला नॉमिनी (नामनिर्देशित व्यक्तीचे नाव) जोडू शकतात. तुम्ही हे काम ऑनलाइन करु शकता. पीएफ खातेधारकांना जितक्या वेळा नॉमिनी बदलायचा आहे तितक्या वेळा ते नॉमिनी बदलू शकता. EPFO ने ट्विट करत म्हटले आहे की खातेधारकांनी आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी ई- नॉमिनेशन भरायला हवे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी EPFO ने युट्यूब लिंक शेअर केली आहे.

नॉमिनी ऑनलाइन जोडण्यासाठी अशी आहे प्रक्रिया

नॉमिनेशन ऑनलाइन भरण्यासाठी खातेधारकाला EPFO च्या https://epfindia.gov.in/site_en/index.php यावर जावे लागेल. त्यानंतर सर्विस ऑप्शनमध्ये जाऊन ड्रॉपडाउनमध्ये फॉर एंप्लॉयीज निवडा. त्यानंतर UAN/online Service (OCS/OTCP) यावर क्लिक करा. यात तुम्ही UAN आणि पासवर्ड सोबत लॉगिन करा. तुमचे फॅमिली डिक्लेयरेशन अपडेट करण्यासाठी यावर क्लिक करा. त्यानंतर फॅमिली डिटेल्सवर क्लिक करावे लागेल. यात नॉमिनेशन डिटेल्सवर क्लिक करुन शेअर केली जाणारी एकूण रक्कम नमूद करा.

त्यानंतर सेव्ह EPF नॉमिनेशनवर क्लिक करा. OTP जनरेट करण्यासाठी ई-साइनवर क्लिक करा. सब्सक्रायबरच्या आधार कार्डशी क्लिंक्ड मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP सबमिट केल्यानंतर तुमचे ई-नॉमिनेशन रजिस्टर्ड होईल. एकाहून अधिक नॉमिनी नमूद करु शकता. त्यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही.

 हे ही वाचा :

 

Back to top button