साहिल खान म्हणतो, मला मराठी चित्रपटात काम करायचंय! | पुढारी

साहिल खान म्हणतो, मला मराठी चित्रपटात काम करायचंय!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेता मॉडेल व बॉडी बिल्डर साहिल खान याला मराठी चित्रपटात काम करायचंय आहे. या अगोदर साहिलने हिंदीतील ‘स्टाईल’ ‘एक्सक्यूज मी’, ‘अल्लादीन’,’डबल क्रॉस’, ‘राम’, ‘द ग्रेट खली’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

पुण्यातील एफ. सी. रोडवरील असलेल्या त्याच्या बायसेप्स दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी साहिल खान नुकताच पुण्यात आला होता. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी त्यांने आता मराठी चित्रपटात काम करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या परिषदेत साहिल म्हणाला, ‘करिअरच्या सुरुवातील मला चित्रपटात काम करण्यासाठी एका मराठी माणसाने संधी दिली. त्यांतर माझा मित्र परिवार सर्व मराठी आहे. माझे कुटुंब पुण्यात राहते. मला महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले आहे. मराठी चित्रपट मी बघत आलो आहे. मराठी चित्रपट आशयघन आणि आयुष्याला दिशा देणारे असतात म्हणून मला मराठी चित्रपटात काम करायचं आहे.’

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक : निवृत्ती गवारी यांची माघार

यापुढे तो म्हणाला की, बॉडी बिल्डिंग करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. नियमित न चुकता व्यायाम, योग्य आहार, योग्य विहार फार महत्त्वाचे आहे. तसेच नशैली पदार्थ व चुकीच्या सवयींपासून तरुणांनी दूर राहावे. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, वेळेत झोप घेणे फार गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करणे हा जीवनाचा गुरुमंत्र असल्याचा सल्ला देखील त्याने यावेळी दिला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button