Samantha Ruth : नागा चैतन्यशी वेगळे झाल्यानंतर सामंथाचं मोठं वक्तव्य | पुढारी

Samantha Ruth : नागा चैतन्यशी वेगळे झाल्यानंतर सामंथाचं मोठं वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ((samantha ruth) नागा चैतन्यशी वेगळे झाल्यानंतर धक्क्यातून बाहेर पडली आहे. ती आपल्या कामावर फोकस करत आहे. चित्रपटांशिवाय, ती सध्या आपल्या अनेक दर्जेदार फोटोशूट्समुळे फॅन्सना वेड लावत आहे. आधीच्या फोटोशूटच्या तुलनेत आताच्या ऑनस्क्रीन लुक्समध्ये तिचा हॉट आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. आता तिने स्वत: आपल्या लुक्सविषयी मोठे वक्तव्य केलं आहे. (samantha ruth)

वास्तविक, सामंथा लवकरच मे-जून २०२२ मध्ये एका प्रसिद्ध मासिकाची कव्हर गर्ल बनणार आहे. सामंथाने ‘पिकॉक मॅगझिन’च्या कव्हर पेजसाठी बरेच फोटोशूट केले आहेत, ज्याची काही झलक तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळणार आहे.

या मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल सांगितले. तिने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा तिला तिच्या त्वचेबद्दल अस्वस्थ वाटायचे. तिच्या कव्हर शूटचा एक फोटो शेअर करत समांथाने लिहिले की, ‘अनेक प्रोजेक्ट्सवर काम केल्यानंतर मला विश्वास वाटतो. आता मी म्हणू शकते की मला आत्मविश्वास आहे आणि हे वय आणि परिपक्वतेसह येते’.

‘मी आधी हिम्मत करू शकले नाही’

याबद्दल बोलताना सामंथा पुढे म्हणाली, ‘माझ्या त्वचेला आराम मिळण्यासाठी मला थोडा वेळ लागला. मी वेगवेगळ्या भूमिका आत्मविश्वासाने साकारते, मग ते एखादे सेक्सी गाणे असो किंवा हार्डकोर अ‍ॅक्शन, जे मी यापूर्वी कधीच करण्याचे धाडस केले नाही. काही काळापूर्वी सामंथानेही ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या आयटम साँगने चांगलीच चर्चा रंगवली होती. या गाण्यात त्याचा सिझलिंग अवतार पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सामंथाच्या झोळीत सध्या अनेक चित्रपट आहेत, ज्यात ‘शकुंतलम’ आणि ‘यशोदा’ यांचा समावेश आहे.

(photo-instagram वरून साभार )

विजय देवरकोंडाला दिल्या खास शुभेच्छा

विजय देवरकोंडाचा ९ मे रोजी वाढदिवस होता. त्याला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या. सर्वात प्रेमळ विश सामंथाने दिली.

सामंथा आणि विजय देवरकोंडा

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button