Prithviraj Trailer : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा ट्रेलर रिलीज, मानुषी छिल्लरचा ग्रँड डेब्यू (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याचा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून रिलीज होण्याची वाट चाहते पाहत आहेत. प्रेक्षकांची प्रतीक्षा थोडी कमी करत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजचा ट्रेलर रिलीज केला आहे. (Prithviraj Trailer) आज सोमवारी, ९ मे रोजी अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर अभिनीत या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर पाहता येईल. (Prithviraj Trailer)
रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे. अक्षयचा दमदार अभिनय दिसत आहे. त्याचबरोबर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा सम्राट पृथ्वीराज चौहान आणि राजकुमारी संयोगिता यांच्या कथेवर आधारित ट्रेलर एकदा पाहायला हवा. याशिवाय, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये १९९१ आणि १९९२ मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील तरेनच्या युद्धाची झलकही पाहायला मिळाली.
ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त अभिनेता सोनू सूद कवी चंद्रवरदाईच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेता संजय दत्त काका कान्हाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. आशुतोष राणा जयचंद आणि मानव विज मोहम्मद गौरीच्या भूमिकेत आहेत. याशिवाय साक्षी तन्वर, ललित तिवारी हेही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पृथ्वीराज हा चित्रपट डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार शाही लूकमध्ये आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील मानुषी छिल्लरचा लूकदेखील आणि अभिनयही प्रेक्षकांना आवडणारा आहे. बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त व्हीएफएक्स (VFX) पाहायला मिळतो.
आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबद्दल माहिती देताना अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ट्रेलरची व्हिडिओ क्लिप शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शौर्य आणि शौर्याची अमर कहाणी… ही कथा आहे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची.”
हेही वाचा :
- Shimron Hetmyer : ‘बाप’ हाेण्याचा आनंद,’आयपीएल’पेक्षा भारी…वेस्ट इंडिजचा हेटमायर मायदेशी
- राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी याचिका दाखल
- पिंपरी : महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार
View this post on Instagram