आमीर खानच्या लेकीनं थेट बिकिनीमध्येच ‘बर्थ डे’ केक कापला ! चाहत्यांनी शिव्यांनी धुर काढला | पुढारी

आमीर खानच्या लेकीनं थेट बिकिनीमध्येच 'बर्थ डे' केक कापला ! चाहत्यांनी शिव्यांनी धुर काढला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार अमीर खानची मुलगी इरा खान जरी फिल्म इंडस्ट्रीत काम करत नसली तरी, सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय आणि चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती स्वत:चे आणि बॉयफ्रेंडसोबतचे हटके फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. दरवर्षीप्रमाणे तिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. बर्थ-डे सेलिब्रेशन दरम्यानच्या तिच्या बिकिनीतील बोल्ड आणि हॉट फोटोमुळे सध्या इरा खान चर्चेत आहे.

इरा खानने यापूर्वी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत स्विमिंगपूल पार्टी केली होती. याचे काही फोटो त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत, इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे इरा खानने तिचे वडील बॉलीवूड अभिनेता आमिर खान, आई रीना दत्ता आणि सावत्र भाऊ आझादसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. केक कटिंग करतानाचा बिकिनीतील तिचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिकिनीतील या बोल्ड फोटोमुळे नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

बिकिनी फोटोमुळे इरा होतेय ट्रोल

ज्या फोटोमुळे इरा खान ट्रोल झाली आहे, त्यामध्ये ती बिकिनी घालूनच केक कापताना दिसत आहे. यावरून तिने स्विमिंग झाल्यानंतर केक कापल्याचे दिसते. तसेच यामध्ये तिच्या जवळ आमिर खान आणि आझादही स्विमिंग कॉश्च्युममध्येच उभे असल्याचे दिसतात. हे पाहून त्यांनी स्विमिंग पूलामध्ये खूप मजा केल्याचे दिसते. इरा खानची ही बिकिनी स्टाईल नेटकऱ्यांना आवडलेली नाही. तिच्यावर नाराज झालेल्या नेटकऱ्यांनी तिला खूप वाईट प्रकारे ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, हे ‘ स्विमिंगपूल पार्टीचा वाढदिवस आहे.’ तर एकाने ‘बेशरम शिट.’ इरा खानला अशाप्रकारे जोरदार ट्रोल केले जोत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Back to top button