Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा भारतात परतणार | पुढारी

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा भारतात परतणार

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) नेहमी तिच्या स्टाईलमुळे आणि फोटोंनी सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रियांका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनास आणि मुलगी (मालती मेरी चोप्रा जोनास) सोबत लॉस एंजेलिसमध्ये वास्तव्यास आहे. परंतु, लवकरच ती आपल्या मुलीसोबत भारतात परत येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

प्रियांकाने कोरोना महामारीच्या काळात बर्लिनमध्ये ‘द मॅट्रिक्स रिझर्वेशन’ आणि यूकेमध्ये ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ या आगामी चित्रपटाचे शूटींग संपवून ती अमेरिकेला परतली आहे. यानंतर २०२२ वर्षाच्या जानेवारी महिन्यात प्रियांका आणि निक जोनासने सरोगसीद्वारे आई-वडील बनल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. या मिळालेल्या वृत्तानंतर चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लढवत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. मध्यंतरी प्रियांकाने आपल्या मुलीच्या नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवण्यात आल्याचे घोषित केले. प्रियांका सध्या सुट्यांचा आनंद घेत असून मालतीसोबत टाईम्स स्पेंड करत आहे.

याच दरम्यान फरहान अख्तर दिग्दर्शित आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर २०२२मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रियांका ( Priyanka Chopra ) लवकरच भारतात परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर यावेळी ती आपल्या मुलगी मालतीही पहिल्यांदा भारतात घेवून येईन असेही सुत्रांकडून सांगितले जात आहे.

या चित्रपटात प्रियांकासोबत बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट याच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात तीन महिला भारतभर रोड ट्रिपसोबत रियूनियनची योजना आखत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

प्रियांकाने सरोगशीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिल्यानंतर ती चित्रपटातून बाहेर पडेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. परंतु, प्रियांकाने तसे काही केले नाही. प्रियांका आणि निक जोनास यांचा सोशल मीडियावर खूपच चाहता वर्ग आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button