…जेव्हा एका कोब्राच्या पोटातून दुसरा कोब्रा बाहेर पडतो, ‘येथे’ घडली ‘ही’ दुर्मीळ घटना

…जेव्हा एका कोब्राच्या पोटातून दुसरा कोब्रा बाहेर पडतो, ‘येथे’ घडली ‘ही’ दुर्मीळ घटना
Published on
Updated on

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

फुत्कार सोडणाऱ्या कोब्राला पकडायला गेले आणि अघटित घडले. त्या कोब्राच्या पोटातून दुसरा कोब्रा बाहेर आला आणि उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला. नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या जवळ असलेल्या हिंगणवाडी येथील टाईल्स (गट्टू) बनविण्याच्या कारखान्यात ही घटना घडली.

गट्टू वाहनात भरणाऱ्या कामगारांना गट्टूच्या ढिगा-यात अडकलेला  (कोब्रा) नाग दिसताच त्यांची पाचावर धारण बसली. साडे चार फुट लांबीचा कोब्रानाग समोर जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. अशातच कारखान्यात सर्वत्र खळबळ उडाली. 

दरम्यान येथील सर्पमित्र विजय बडोदे यांच्याशी वेल्डर मोहन शिलावट, पप्पू देवरे, दीपक नन्नावरे यांनी तातडीने संपर्क साधला. बडोदे ही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चिमट्याने त्यांनी नागाला बाहेर काढले त्याक्षणी नागाने गरळ ओकली. भीतीने आक्रमक झाल्यानंतर स्वसंरक्षणार्थ साप असे करतात.

पण, यावेळी चक्क सुमारे अडीच फुट लांबीचा दुसरा मृत नाग मोठ्या नागाच्या तोंडातून बाहेर पडल्याने या घटनेची दुर्मिळ घटनांत नोंद झाली. साप सापाला गिळतात किंवा कोब्रा नाग सापाला खातो अशी माहिती आहे. पण ते प्रत्यक्ष बघायला मिळत नाही. मात्र, हे दुर्मिळ दृश्य नाशिक जिल्ह्यातील हिंगणवाडीत दिसले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news