आईच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही : उर्मिला जगताप | पुढारी

आईच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही : उर्मिला जगताप

पुढारी ऑनलाईन डेस्क

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, ग. दि. माडगुळकर यांच्या गाण्यातील ओळ किती पटणारी आहे. त्यामुळे जशी आपण देवाची वर्षातून एकदाच पूजा करत नाही, तसंच आईचंही आहे. आजच्या दिवशी आईवरचं प्रेम उतू जावं असं कधीच होऊ नये. बारा महिने आईचेच दिवस असतात आणि बारा महिने तिच्यावरचं प्रेम, तिचा आदर, तिने केलेल्या कष्टाची जाण आपल्याला असली पाहिजे. अभिनेत्री उर्मिला जगताप हिने आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केला. ८ मे रोजी मदर्स डे आहे. यानिमित्त तिने भावूक उद्गार काढले.

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खरं तर आमच्या घरात अनुभव नव्हता, त्यामुळे कुटुंबातले आधीच शाशंक होते. पण माझी या क्षेत्रात येण्याची इच्छा पाहता, आईने एकच सांगितले, “जे काही करशील ते मनापासून कर. मेहनत केल्याशिवाय तुला जे हवं आहे ते कधीच मिळणार नाही आणि मेहनती विना केलेलं काम कधीच पचणार नाही. तसंच पैशाच्या मागे कधीच धावू नकोस, पैसा तुझ्याजवळ येऊ दे.”

प्रामाणिकपणे काम करशील तर खूप मोठी अभिनेत्री होशील, असं ती मला सतत म्हणत असते. तिनं शिकवलेल्या या गोष्टी मी कधीच विसरु शकणार नाही.

खरंतर आईने लहानपणी सांगितलेल्या गोष्टी पटायला वेळ लागतो. पण, कामामुळे मुंबईत राहायला लागल्यावर तिची क्षणाक्षणाला आठवण येते आणि तिचं असलेलं माझ्यावरचं प्रेम, काळजी सतत जाणवते. आईचा दिवसभरात एकतरी फोन असतो आणि तिच्या फोनमुळे सगळा थकवा निघून जातो. पण, तिच्या हातचं जेवण मी खूप मिस करते. त्यातही आईच्या हातची भाकरी आणि मटण माझी आवडती डिश आहे. तसंच तिचा ओरडाही मी मिस करते.

आईने मला सांगितलेलं आहे की, कोणाबद्दलही वाईट विचार करु शकत नाही. आपण जे लोकांबद्दल विचार करतो तेच आपल्यासोबत घडतं. जे देवाने दिलं आहे त्यात त्याचे आभार मानले पाहिजे.

urmila jagtap with mother

जगातल्या सगळ्याच आई या सुखी, समाधानी आणि निरोगी असाव्यात असं मला वाटतं. कारण प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी कष्ट करत असते. फक्त मुलांना त्याची जाणीव असली पाहिजे. माझ्या आईनेही मला मोठं करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. एक दिवस तिला हे कष्ट करावे लागणार नाही, यासाठी प्रयत्न करणार.

मी एक स्वतःला प्रॉमिस केले आहे. आईच्या डोळ्यात माझ्यामुळे कधीच पाणी येणार नाही. मदर्स डे या दिवशी एवढेच म्हणेन तू मला जन्म दिलास, माझ्यासाठी कष्ट केलेत, तू मला आकार दिलास. हे मी कधीच विसरु शकत नाही. मला आधी तुझ्यासारखी व्यक्ती व्हायचं. अशीच प्लीज माझ्यासोबत कायम राहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmila Jagtap (@urmilaajagtap)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmila Jagtap (@urmilaajagtap)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmila Jagtap (@urmilaajagtap)

Back to top button