Fire in Indore : इंदौरमध्‍ये अग्‍नितांडव, सात जणांचा होरपळून मृत्‍यू | पुढारी

Fire in Indore : इंदौरमध्‍ये अग्‍नितांडव, सात जणांचा होरपळून मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: मध्‍य प्रदेशमधील इंदौर येथे आज पहाटे एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे. जखमींना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ( Fire in Indore)

इंदौर शहरातील विजय नगरमध्‍ये स्‍वर्णबाग कॉलनी शनिवारी पहाटे तीन वाजण्‍याच्‍या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्‍निशमन दलासह पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. तब्‍बल तीन तासांच्‍या अथक प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात यश आले.

Fire in Indore : शॉर्ट सर्किटमुळे आग

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. सुरुवातीला इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये आग लागली. काही मिनिटांमध्‍ये आगीने संपूर्ण इमारतीला आपल्‍या कवेत घेतले. या इमारतीमध्‍ये भाडेकरु राहत होते. पहाटे सर्वजण झोपतअसल्‍यामुळे त्‍यांना बाहेर पडण्‍यास वेळच मिळाला नाही. सात जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर जखमींना रुग्‍णालायात दाखल करण्‍यात आले आहे. दरम्‍यान,मध्‍य प्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मृतांच्‍या नातेवाईकांना प्रत्‍येकी ४ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button