

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नोरा फतेहीचा (Nora Fatehi) एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यामध्ये नोरा फतेही आपली लग्झरी कार सोडून एका स्कूटीवर बसून निघुन जाते. तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तिच्या डाउन टू अर्थसाठी तिचे कौतुकही केले जात आहे. ईदच्या दिवशी एका कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. यावेळी ती माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.
नोरा फतेही स्कूटरवरून…
नोरा फतेही (Nora Fatehi) अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता मंगळवारी ईदच्या निमित्ताने नोरा फतेही मुंबईत दिसली. तिचा व्हिडिओ एका पापाराझीने शेअर केला आहे. नोरा फतेही स्कूटरवरून फिरताना दिसत आहे. यावेळी तिला स्कुटीवरून फिरायला नेणाऱ्या ड्रायव्हरला चाहते लकी मॅन म्हणत आहेत. नोरा फतेहीचे अनेकांनी डाउन टू अर्थ असे वर्णन केले आहे. एका चाहत्याने लिहिले 'तो मुलगा खूप भाग्यवान आहे.'
व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने (Nora Fatehi) सलवार, कुर्ता आणि ओडणी परिधान केली आहे. नोरा फतेही डान्स दिवाने ज्युनियरची जज आहे. या शोमध्ये तिच्या शिवाय नीतू कपूर आणि मर्झी देखील जज आहेत. तर करण कुंद्रा हा शो होस्ट करत आहे. नोरा अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नोरा फतेही टेरेन्स लुईसला डेट करतेय…
नुकतीच बातमी आली आहे की नोरा फतेही (Nora Fatehi) टेरेन्स लुईसला डेट करत आहे. या दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे. त्यांच्याकडे पाहून असे दिसते की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. याबाबत विचारले असता टेरेन्स म्हणाला, 'मला वाटते आमची केमिस्ट्री छान आहे. आम्ही एकमेकांना आवडतो आणि ती खूप मेहनती मुलगी आहे. जे मनात येईल ते ती बोलते.' नोरा फतेहीचा डान्स परफॉर्मन्सलाही चाहत्यांकडून पसंद केले जात आहे.
हे वाचलंत का?