Met Gala २०२२ : नताशा पूनावालाच्या गोल्डन साडीवर खिळल्या नजरा | पुढारी

Met Gala २०२२ : नताशा पूनावालाच्या गोल्डन साडीवर खिळल्या नजरा

पुढारी ऑनलाईन : मेट गालाला चित्रपटांच्या दुनियेत ऑस्करइतकेच मोठे स्थान आहे. या फॅशन शोमध्ये जगभरातील निवडक सेलिब्रिटी आणि कलाकार सहभागी होत असतात. सध्या मेट गालाच्या ( Met Gala २०२२)  रेड कार्पेटवर उद्योजक नताशा पूनावाला पोहोचली आहे. यातील खास म्हणजे. यावेळी तिच्या गोल्डन रंगाची साडी आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली.

नुकतेच मेट गालाच्या ( Met Gala २०२२) रेड कार्पेटवर नताशा पूनावालाने एन्ट्री करताच चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यावेळी तिने गोल्डन रंगाची साडी परिधान करून चारचॉंद लावले आहेत. या साडीवर गोल्डन हॅडक्राफ्टेड ट्यूलचा वापर करत सिल्क एंब्रॉयडरी केली आहे. तर साडीत वेलवेट, बहूमूल्य रत्न, स्टोन्स आणि क्रिस्टल्सचा वापर केला आहे. या लूकमध्ये नताशा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

यावर्षीचा मेट गाला न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. या संभारंभात अनेक स्टार्संनी हजेरी लावली होता. परंतु, यातील खास आकर्षणाचा केंद्रबिदू नताशाने परिधान केलेल्या डिझायनर सब्यसाची मुखर्जीची साडी ठरली. नताशाचे हे फोटो डिझायनर सब्यसाची इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.

हे फोटो शेअर करताना डिझायनर सब्यसाची यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी “माझ्यासाठी साडी हा एक अतिशय अनोखा आणि बहुमुखी पोशाख आहे. जो एखाद्याची ओळख ठरवू शकतो. मी फॅशनच्या जगात नवीन होतो तेव्हा मला असे वाटायचे की, भारतीय साडी घालून मेट गालाच्या प्लॅटफॉर्मवर कधी दिसणार आहे. ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे. या वर्षीच्या मेट गालाची थीम ‘इन अमेरिका: अॅन अँथॉलॉजी ऑफ फॅशन’ होती. यामुळे भारतीय लुक, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि सभ्यता यांच्याशी सोनेरी फॅशनच्या ड्रेस कोडला जुळवून घेण्याची होती. असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

(photo : sabyasachiofficial instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

Back to top button