Doctor Strange 2 : भारतात ॲडव्हान्स बुकिंगमधून १० कोटींचं कलेक्शन | पुढारी

Doctor Strange 2 : भारतात ॲडव्हान्स बुकिंगमधून १० कोटींचं कलेक्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क

मार्वल सिनेमेटिक युनिव्हर्सचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ चर्चेत आहे.  (Doctor Strange 2) साऊथ चित्रपटांप्रमाणे रिलीज होण्याआधी ‘डॉक्टर स्ट्रेंज २ (Doctor Strange 2) नवा रेकॉर्ड करण्यासाठी तयार आहे. पुढील महिन्यात रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे ‘बाहुबली-२’ आणि ‘केजीएफ-२’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांप्रमाणे ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट रिलीजपूर्वीच भारतात ॲडव्हान्स बुकिंगमधून १० कोटींचं कलेक्शन केलं आहे.

दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर मार्वल स्टुडिओजने चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग काही दिवसांपूर्वी सुरू केली होती. पण, आता असं वाटत आहे की, या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे.

ॲडव्हास बुकिंगमध्ये कमावले इतके कोटी

मार्वलच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले आहेत. यंदा पुन्हा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ ने एक नवं रेकॉर्ड बनवेल, असे वाटते. डॉक्टर स्ट्रेंजच्या यंदाच्या दुसऱ्या भागाची भारतात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालीय. आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून या चित्रपटाने १० कोटी जमवले आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यास अद्याप १० दिवस बाकी आहेत. पण, कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.

बंपर ॲडव्हान्स ओपनिंग असणारा पहिला चित्रपट

मार्वल स्टुडिओजचा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ २०२२ सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यावर्षीची सर्वात मनोरंजक चित्रपट डॉक्टर स्ट्रेंज असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत अन्य हॉलीवूड चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये इतका उत्साह पाहायला मिळाला नव्हता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढील आठवड्यात हा चित्रपट रिलीज होईल.

सहा भाषांमध्ये रिलीज होणार

पहिल्यांदा असं झालं आहे की, भारतात एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग एक महिन्याआधीचं सुरू झाले आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ ६ मे, २०२२ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाईल.

Back to top button