युसूफ लकडावालाचे कोणासोबत फोटो यापेक्षा कोणाशी व्यवहार हे महत्त्‍वाचे : संजय राऊत | पुढारी

युसूफ लकडावालाचे कोणासोबत फोटो यापेक्षा कोणाशी व्यवहार हे महत्त्‍वाचे : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : युसूफ लकडावाला याच्‍यासाेबत महाविकास आघाडीच्‍या नेत्यांचा फोटो आहेत. आजच्‍या मोबाईलच्या जमान्यात कोणाताही फोटो काेणाजवळही  लावला जावू शकतो. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झालेल्‍या युसूफ लकडावाला यांच्‍याबराेबर काेणाचे फाेटाे आहेत यापेक्षाही  त्याच्‍याशी काेणाचे आर्थिक व्यवहार आहेत हे महत्त्‍वाचे आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

माध्‍यमांशी बाेलताना राऊत म्‍हणाले की, पंतप्रधान मोदींची सर्व राज्‍यांच्‍या मुख्यमंत्र्यांसोबतची कोरोना मार्गदर्शनसंबंधी संवाद बैठक काल (दि. 27, बुधवार) पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी कोरोना सोडून इतर विषयांवर जास्तच तारा छेडल्या. त्‍यांनी कोरोनाबाबत काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. हा एक एकतर्फी संवाद होता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या मार्गदर्शनाकरिता बोलवलेल्या बैठकीत बिगर भाजपशासित राज्य असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारल्‍याची चर्चा दिसून आली; पण मराठी बाण्याला जागून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना व्यवस्थित उत्तर दिलय. कालच्या बैठकीबाबत ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री या सर्वांनी ही एकतर्फी बैठक असल्याचे सांगितले आहे, असेही ते म्‍हणाले.

नवनीत राणा यांनी दाऊद टोळीशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला हाेता. ईडीने राणा यांच्या कर्जाबाबत तपास करणे गरजेचे आहे. तसेच हा देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे, असेही राऊत यांनी म्‍हटले हाेते.  तसेच ईडीकडून या प्रकरणाची चौकशी होईल का? असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला हाेता.

हेही वाचा

Back to top button