‘केजीएफ-2’ची हीरोईन श्रीनिधी शेट्टी | पुढारी

‘केजीएफ-2’ची हीरोईन श्रीनिधी शेट्टी

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या ‘केजीएफ-2’ ने अपेक्षेप्रमाणे ‘छप्पर फाड’ कमाई केली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट नवे नवे विक्रम करीत आहे. यामध्ये यशसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीनिधी रमेश शेट्टी ही आहे. तिच्याविषयी आपल्याकडील लोकांना अतिशय कमी माहिती आहे.

श्रीनिधीने ‘केजीएफ चॅप्टर-1’ मध्येही भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात तिला नायक पसंत नसतो असे दाखवलेले आहे. मात्र, दुसर्‍या भागात ती नायकाच्या प्रेमात पडते. ही दोन्ही रूपं श्रीनिधीने चांगली दाखवलेली आहेत. श्रीनिधी ही ‘मिस दिवा सुपर नॅशनल 2016’ स्पर्धेची विजेती आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती दुसरी भारतीय तरुणी ठरली होती.

‘केजीएफ चॅप्टर-1’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आठव्या ‘एसआयआयएमए’ सोहळ्यात तिला सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय 66 व्या फिल्मफेअर सोहळ्यातही तिला पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button