क्रिती सेननचे ‘व्हिसल बजा 2.0’ | पुढारी

क्रिती सेननचे ‘व्हिसल बजा 2.0’

पुढारी ऑनलाईन : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननने ‘हीरोपंती’ मधून पदार्पण केले होते. आता ‘हीरोपंती-2’ येत आहे; पण त्यामध्ये टायगरबरोबर क्रितीऐवजी तारा सुतारिया आहे. क्रितीने यामध्ये हीरोईनची भूमिका केलेली नसली तरी या चित्रपटात ती एका गाण्यात दिसून येणार आहे. ‘व्हिसल बजा 2.0’ या गाण्यात ती टायगरसमवेत थिरकताना दिसून येते.

नुकतेच हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले. 2014 मध्ये आलेल्या ‘हीरोपंती’मधील ‘व्हिसल बजा’ गाण्यातील दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. आता 2022 मध्ये पुन्हा हे गाणे दोघांनी पडद्यावर सादर केले आहे. या गाण्याला मिका सिंह आणि नीती मोहन यांनी आवाज दिला आहे.

टायगर एक उत्तम नर्तक आहे आणि क्रितीही चांगले नृत्य करते. या गाण्यातही दोघांनी आपले नृत्यकौशल्य चांगल्या प्रकारे दाखवले आहे. चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button