खेड शहरात ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहन | पुढारी

खेड शहरात ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहन

खेड : पुढारी वृत्तसेवा

खेड नगर परिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेला गती देण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नगर परिषदेकडून मोक्याच्या ठिकाणी जनजागृतीवर भर देण्यात येत असतानाच ई -कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी ई -कचरा संकलनाची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र वाहनदेखील उपलब्ध केले असून हे वाहन संपूर्ण प्रभागात फिरत आहे.

या मोहिमेस नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अभियानांतर्गत नगर परिषदेकडून मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेसह विवीधांगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर स्वच्छता कर्मचार्‍यांमार्फत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी झटत आहेत. ओल्या व सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे.
या अभियानांतर्गत शहरात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात असतानाच आपला मोर्चा ई – कचरा संकलनाकडे वळवला आहे. नगर परिषदेने ई -कचरा मोहीम हाती घेतली आहे.

Back to top button