Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर यांच्‍या वैवाहिक जीवनाबाबत ज्‍योतिषी म्‍हणतात, दोघांच्‍याही आयुष्‍यात..." | पुढारी

Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर यांच्‍या वैवाहिक जीवनाबाबत ज्‍योतिषी म्‍हणतात, दोघांच्‍याही आयुष्‍यात..."

पुढारी ऑनलाइन डेस्‍क: बॉलीवूडमध्‍ये  अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे चार वर्षांच्‍या रिलेशनशीपनंतर आज लग्‍न बेडीत अडकत आहेत. ( Ranbir-Alia Wedding ) या बहुचर्चित विवाह सोहळ्यासह त्‍यांचे वैवाहिक आयुष्‍य कसे असेल? याची भविष्‍यवाणी काही ज्‍योतिषांनी केली आहे. जाणून घेवूया आलिया आणि रणबीर यांच्‍या वैवाहिक आयुष्‍याबद्‍दल ज्‍याेतिषी काय म्‍हणतात ते…

Ranbir-Alia Wedding : दोघांचाही आयुष्‍यात नवे पर्व सुरु होईल…

Alia Bhatt wedding www.pudhari.news
A

ज्‍योतिषी डॉ. आचार्य विनोद कुमार यांनी आलिया आणि रणबीर यांच्‍या वैवाहिक आयुष्‍याबाबत म्‍हटलं आहे की, दोघांच्‍या कुंडलीनुसार दोघांही एकमेकांना पूरक आहे. या लग्‍नानंतर दोघांच्‍याही आयुष्‍यात सुख आणि समृद्‍धी वाढणार आहे. दोघांचे व्‍यक्‍तिगत आणि व्‍यावसायिक आयुष्‍यात आनंदाचे नवे पर्व सुरु होईल.

रणबीर कपूरचा विचार करता लग्‍नानंतर तत्‍काळ प्रसिद्‍ध होणारे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई करतील. दोघांना अपत्‍य सुखही चांगले आहे. दोघांचे आरोग्‍यही चांगले राहणार आहे. आलिया ही दोघांच्‍या नात्‍यांमधील समन्‍वय आणि आदर राखण्‍यासाठी प्रयत्‍न करेल. एकुणच त्‍यांचे वैवाहिक जीवन हे आयुष्‍यात नवसुख आणि समृद्‍धी आणणारे ठरेल, असेही भाकित डॉ. आचार्य विनोद कुमार यांनी केले आहे.

वैवाहिक आयुष्‍यात अनेक चढ-उतार येतील

रणबीर-आलिया

सेलिब्रिटींचे ज्‍योतिषी अशी ओळख असणारे भाविक सांघवी यांनी म्‍हटलं आहे की, रणबीर कपूरची जन्‍मतारीख २८ सप्‍टेंबर १९८२ आहे. तो तुला राशीशी संबधित असून, त्‍याचा भाग्‍यांक क्रमांक तीन आहे. तर आलियाची जन्‍म तारीख १५ मार्च १९९३ आहे. तिचा भाग्‍यांक ४ आहे. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अआणि यापुढेही ते कायम राहतील. रणबीर कपूर हा ४० वर्षांचा आहे. तो मागील रिलेशनशीपमधून खूप काही शिकला आहे. त्‍यामुळे आता तो एक विश्‍वासू जोडीदार ठरणार आहे.आलिया आणि रणबीर यांना दोन अपत्‍य होतील. त्‍यांच्‍या वैवाहिक आयुष्‍यात अनेक चढ-उतार येतील, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button