‘धाकड’चा आला टिझर | पुढारी

‘धाकड’चा आला टिझर

पुढारी ऑनलाईन

कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘धाकड’चा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्वतः कंगनाने हा टिझर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे, ‘अ‍ॅक्शन, स्टाईल, थ—ील…ऑल इज वन एजेंट अग्‍नि इज हेयर!’ या चित्रपटात कंगना ‘एजंट अग्‍नि’च्या भूमिकेत दिसणार आहे. तिने आपले सात वेगवेगळे लूक आणि अनेक कॉम्बेट सीन्समधून प्रेक्षकांना चकीत केले आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांचे डिझाईन आणि कोरियोग्राफी असलेला आहे. कंगनाची ही आणखी एक झुंजार भूमिका असलेला चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Back to top button