कोल्हापूर : जोतिबाची आरती, ओव्या अन् ग्रंथसंपदा

गणेश उत्‍सव २०२३ :  श्री ज्योतिबाची आरती
गणेश उत्‍सव २०२३ : श्री ज्योतिबाची आरती
Published on
Updated on

कोल्हापूर : सागर यादव
'उत्तरेचा देव दक्षिणी आला। दक्षिण-केदार नामे पावला। रत्नासुर मर्दुनी भक्‍ता पावला। दख्खनाचा राजा जोतिबा…' अशा आशयाच्या आरती, ओव्यांसह विविध ग्रंथ संपदेतून दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा सांगण्यात आला आहे. जोतिबा देवालयाचे महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचविणारे हे प्रभावी माध्यमच ठरले आहेत.

जोतिबासंदर्भातील विविध ग्रंथ सामग्री – कंसात लेखक

श्री केदार विजय (हरी गोपाळ अंगापूरकर), करवीर माहात्म्य (कै. दाजीबा जोशीराव), श्री केदार विजय कथासार (वामनराव भाटे), श्री ज्योतिर्लिंग अवतार व कार्य (गणेश विठ्ठल चिखलीकर), श्री क्षेत्र जोतिबा (रामदास लादे), दख्खनचा राजा श्री जोतिबा (सखाराम बुरांडे), श्री जोतिबा माहात्म्य (उमाकांत राणिंगा व अ‍ॅड. प्रसन्न मालेकर), आधुनिक भगीरथ राजर्षी शाहू (द. ना. साठम), करवीर गॅझेटियर (बाळाजी प्रभाकर मोडक), कोल्हापूर कर्नाटक प्रांताचा इतिहास (बाळाजी प्रभाकर मोडक), महालक्ष्मी (रा. बा. जाधव), अभिनव ज्ञानकोश (ग. रं. भिडे), करवीर रियासत (स. मा. गर्गे), हिम्मत बहाद्दूर चव्हाण घराण्याचा इतिहास (वा. वा. खरे), करवीर माहात्म्य (पंडित बाळाचार्य खुपेरकर), यादवकालीन महाराष्ट्र (मु. ग. पानसे), ढशाश्रिशी ेष र्ीेीींह खपवळर (घ. ड. डहीळपळुरी) , कळीीेीूं ेष र्लीर्श्रीीींश ेष ींहश खपवळरप झशेश्रिश (ऊी. ठ. उ. र्चीर्क्षीावरी), करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (बा. बा. महाराज), लोकजीवन आणि लोकसंस्कृती (डॉ. द. ता. भोसले), जोतिबा (सरोजिनी बाबर), रंग लोकसंस्कृतीचे (सौ. सोना नलगे), जोतिबा माहात्म्य (विजय रामकृष्ण शेंडे), जोतिबा : एक लोकदैवत ( सुनीलकुमार सरनाईक).

'जोतिबा : एक लोकदैवत इत्यंभूत माहितीचा ग्रंथ

'श्री जोतिबा : एक लोकदैवत' हा सुनीलकुमार सरनाईक लिखित ग्रंथ इत्यंभूत माहितीने परिपूर्ण असा ग्रंथ असून याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, एमफिल, पीएचडीसाठी हा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला जातो. जोतिबाचे धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक महत्त्व, मूर्ती, मंदिराचे स्थापत्य, विविध देवता, बारा ज्योतिर्लिंगे, जोतिबाची वैशिष्ट्ये, जत्रा-यात्रा-धार्मिक विधी, मानकरी घराणी व त्यांचे मान, सेवकरी व त्यांचे काम, लोकगीतांतील जोतिबा, श्री जोतिबा मंदिर : अभिजात वास्तुकलेचा आविष्कार, श्री क्षेत्र जोतिबा : समता, बंधुता व एकतेचे प्रतीक अशा तब्बल 60 प्रकरणांतून हा ग्रंथ परिपूर्ण झाला आहे.

जोतिबाच्या ओव्या

'उठी उठी बा केदारा । जगदीश्‍वरा जगदोद्धारा, चिदाकाशींच्या दिनकरा । वेगी उठावे… ।धृ.। पहाटेचा प्रहर प्रभा फाकली तक्‍तावर । द्वारी उभा भक्‍ता किंकर मधुर स्वरे उठवीतो ॥ उठी उठी बा केदारा… ॥1॥ रत्नागिरी गुहालंल्‍ली । उगवली केदाखल्‍ली । ज्ञानरूपी फुले फाकल्‍ली । सद्भक्‍ता कारणे ॥ उठी उठी बा केदार..॥2॥ अशा ओव्याही जोतिबावर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक सरोजिनी बाबर यांच्या 'कुलदैवत' पुस्तकात लोकसाहित्यात मौखिक रूपाने जतन केलेल्या अशा ओेव्यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news