६३ वर्षांच्या डान्सिंग दीदीच्‍या ‘अवतरली सुंदरा…’ला नेटकर्‍यांची भरभरुन दाद ( Viral Video )

Dancing Didi
Dancing Didi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) लवकरचं तिचा 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील काही गाण्यांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकताच या चित्रपटातील एका लावणीवर एका ६३ वर्षीय आज्जींचा (Danceing Didi ) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Viral Video)

अमृता खानविलकरचा  'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. या तील चंद्रा या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकताच चंद्रा गाण्यावर ६३ वर्षांच्या आज्जीने ( Danceing Didi ) भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमृता खानविलकरनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंवर शेअर केला आहे. नेटकर्‍यांनी आज्जींच्या कलेला भरभरुन दाद दिली आहे.

Danceing Didi : कोण आहेत डान्सिंग दीदी?

मुळच्या उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील असलेल्या रवि बाला शर्मा या आपल्या दोन मुलांसह मुंबईमध्ये राहतात. लोकगीत ते बॉलिवूड पर्यंतच्या गाण्यावरील डान्‍सचे  व्हिडिओ त्‍या इन्‍स्‍टाग्रामवर शेअर करत असतात. दिल्ली येथील सरकारी शाळेत त्यांनी २७ वर्षे संगीत टीचर म्हणून काम केले. त्या कथक, गायन, आणि तबला वादनामध्ये पारंगत आहेत. त्यांनी त्यांचे वडील शांती स्वरुप शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले हाेते. निवृत्तीनंतरही त्यांनी राहून गेलेली आपली नृत्‍य कला जपली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या व्हिडीओ शेअर करु लागल्या. बघता बघता त्या इन्स्टाग्राम सेलिब्रिटी झाल्या. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत त्यांचे चाहते आहेत. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, मी सिध्द करुन दाखवलं, 'वय एक आकडा आहे', तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही वळणावर नव्याने सुरुवात करुन तुमची ओळख बनवु शकता. आज त्यांनी डान्सिंग दीदी म्हणून स्‍वत:ची स्‍वतंत्र ओळख बनवली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news