Yashoda : सामंथा रावडी लूकसाठी घेतेय कठाेर मेहनत (Video) | पुढारी

Yashoda : सामंथा रावडी लूकसाठी घेतेय कठाेर मेहनत (Video)

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या गाण्याने प्रसिद्ध झोतात आली. यानंतर सामंथाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतिक्षा आता संपली आहे. सामंथा प्रभू आगामी थ्रिलर ‘यशोदा’ (Yashoda) हा चित्रपट घेवून येत असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी दिली आहे. तर सध्या ती जिममध्ये रावडी लूकसाठी कसरत करताना दिसली आहे.

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी नुकतेच ‘यशोदा’ ( Yashoda )  चित्रपटाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सामंथाच्या आगामी यशोदा चित्रपटाची तारिख १२ ऑगस्ट २०२२ अने नमूद केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘१२ ऑगस्ट २०२२ रोजी सामंथाचा पॅन-इंडिया चित्रपट येत आहे. याचे शूट मे अखेरपर्यंत पूर्ण होईल.’ असे लिहिलं आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशोदा हा चित्रपटात सांमथाची दमदार ॲक्शन स्टाईल पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे ३० कोटी असल्याची माहिती मिळत आहे.

या चित्रपटात सामंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा आणि प्रियांका शर्मा हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हरी आणि हरीश तर निर्मिती शिवलेंका कृष्ण प्रसाद यांनी केले आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्यांनी सांगितले की, “समंथाने केवळ अभिनयच नाही तर यशोदाच्या फाइट सिक्वेन्समध्येही उत्तम काम केले आहे. मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. याच दरम्यान सांमथा चित्रपटातील रावडी लूकसाठी कडी मेहनत घेताना देखील दिसत आहे. सध्या तिचा जिममध्ये कसरत करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सांमथाने ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसिरीजमध्ये केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button