देवेंद्र फडणवीस : एक मुख्यमंत्री घेऊन पक्षाची काय अवस्था केली, फडणवीसांची राऊतांवर टीका | पुढारी

देवेंद्र फडणवीस : एक मुख्यमंत्री घेऊन पक्षाची काय अवस्था केली, फडणवीसांची राऊतांवर टीका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : संजय राऊत यांच्या मालमत्तांवर कारवाई झाल्याने ते काहीही बोलत आहेत. नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न राऊत करत आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे असे ते वागत आहेत. आमच्या लोकांच्या घराची मापे घेऊन त्यांनी कारवाई केली. पत्राचाळ ही गरीब लोकांची चाळ आहे. पण यात त्यांनी तडजोड केली आणि सगळ्या बिल्डरांच्या घशात घातली. याचीच त्यांना फळे भोगावी लागत आहेत. मी मुख्यमंत्री असताना यावर कारवाईचे आदेश केले होते, अशी घाणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

फडणवीस पुढे म्हणाले की, एक मुख्यमंत्री घेऊन पक्षाची काय अवस्था केली आहे हे राऊतांनी पहिल्यांदा तपासावे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कितवी टीम आहे हे पहा, असा घाणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.

जे पुरावे ईडीकडे आहेत त्यावर कारवाई होत आहे. आयएनएस विक्रांत बाबत राऊत जे आरोप करत आहेत त्यात काय तथ्य आहे हे तपासावे लागेल. असे फडणवीस म्हणाले.

राऊत हास्यास्पद आरोप किरीट सोमय्यांवर करत आहेत. पण त्यांनी कुठल्याच आरोपांचे पुरावे दिले नाहीत. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला. पण त्यांना यात काहीच साध्य करता आले नाही.

ते कितीही पुरावे गोळा करू देत त्यांना किरीट सोमय्यांच्या विरोधात काहीही सापडणार नाही. ते कुठे गुन्हा दाखल करणार आहेत त्यांचा काय प्लान आहे आम्हाला सगळे माहिती असल्याचे फडणवीस म्हणाले. किरीट सोमय्यांवर ते कितीही आरोप करू देत पण मराठी माणसाला कोणी लुटले आहे ते जनतेला माहिती आहे, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस : राजू शेट्टी देर आये पर दुरूस्त आये…

महाविकास आघाडीसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टींचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढत होते म्हणून त्यांना लोकांनी विश्वास दाखवला. पण त्यांनी आता जो निर्णय घेतला तो योग्य आहे. शेट्टीनी आमच्यावर टीका केली असेल पण त्यांनी ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले यासाठी त्यांनी आम्ही शुभेच्छा देत आहोत. महाविकास आघाडीकडून त्यांची झालेली कुचंबणा थांबेल, असे फडणवीस म्हणाले.

Back to top button