HBD Kapil : खटारा स्कूटरवाल्या कपिलची 'लव्हस्टोरी' | पुढारी

HBD Kapil : खटारा स्कूटरवाल्या कपिलची 'लव्हस्टोरी'

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज कॅमेडियन कपिल शर्मा याचा वाढदिवस आहे.  (HBD Kapil) कपिल शर्माने गिन्नी चतरथसोबत लव्ह मॅरेज केलं आहे. दोघांची प्रेमकहाणी खूप गाजली. दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. खटारा स्कूटरवाल्या शर्माने चक्क दारू पिऊन प्रपोज केलं होतं.”

दोघांची कथा खूपच फिल्मी आहे, याचा खुलासा खुद्द  कपिल शर्मा याने त्याच्या एका शोमध्ये केला होता. कपिल शर्माने सांगितले होते की, तो सेकंड हँड स्कूटरवर कॉलेजला जायचा आणि गिन्नी चतरथ २० लाखांच्या कारने यायची.

मारायला किती गाड्यांतून येणार?

कपिल शर्माने सांगितले की, गिन्नी त्याला आवडत असे आणि त्याचे मित्र त्याला याबद्दल चिडवायचे. कपिल शर्माला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो त्याच्या मित्रांना म्हणाला, तुम्ही माझी स्कूटर पाहिली आहे का? आणि तुम्ही तिची कार पाहिली आहे का? जितक्या किंमतीची माझी स्कूटर आहे, तितक्या किंमतीचं पेट्रोल रोज ती आपल्या गाडीमध्ये भरते. कपिलने त्याच्या शोमध्ये गंमतीने म्हटले होते की, तिचे वडील तिला २० लाखांच्या कारमध्ये अभ्यासासाठी पाठवतात, ते त्याला मारायला आले तर किती गाडया घेऊन येणार?

जेवणामागील प्रेम समजले नाही

कपिल शर्माने सांगितले की, त्याला समजले की गिनी त्याला आवडते. तथापि, एकदा तिने त्याच्यासाठी जेवण आणले, तेव्हा कपिल शर्माला त्याच्यामागचे प्रेम दिसले नाही; परंतु गिन्नीने आपली जुनी स्कूटर पाहिली तर नसेल, असे त्याला वाटले. कपिल शर्माने सांगितले की, गिनीमुळे मला खायला तर मिळत होते, फक्त पेट्रोल थोडे महाग होते.

दारू पिऊन केलं होतं प्रपोज

कपिल शर्माने याच शोमध्ये गिन्नी चतरथला प्रपोज करतानाचा किस्सा सांगितला हाेता. कपिल शर्माने सांगितले होते की, एके दिवशी कपिल दारू प्यायला आणि त्याने गिन्नीला फोन करून थेट विचारले की, ‘ती त्याच्यावर प्रेम करते का?’ मग गिन्नीनेही तिचं प्रेम व्यक्त केलं आणि ही प्रेमकहाणी सुरु झाली.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ginni Chatrath (@ginnichatrath)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ginni Chatrath (@ginnichatrath)

Back to top button