‘मी चुकलोय…’ विल स्मिथचा जाहीर माफीनामा, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर व्यक्त केला खेद | पुढारी

‘मी चुकलोय...' विल स्मिथचा जाहीर माफीनामा, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर व्यक्त केला खेद

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील  निवेदक क्रिस रॉकला (Chris Rock) कानाखाली मारल्यानंतर अभिनेता विल स्मिथने इन्स्टाग्राम माफीनामा लिहिला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ही कृती लज्जास्पद आणि मर्यादेपलीकडची होती. माझ्या या वागण्यामुळे त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय.

लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टक्कलवरून रॉकने मस्करी केली. त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर जाऊन क्रिसच्या कानशिलात लगावली.

विलने माफीनाम्यात काय म्हटलंय?

कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे, असं मी समजू शकतो, परंतु माझी पत्‍नी जाडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही. भावनेच्या अधीन झाल्याने मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे क्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलो. या प्रेमळ जगात हिंसेला स्थान नाही. मी अकॅडमी, शोचे निर्माते, सर्व उपस्थित पाहुणे आणि जगभरातील प्रेक्षकांची माफी मागतो. मी विलियम्स आणि माझ्या किंग रिचर्डच्या कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्या या वागण्यामुळे त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय.

सोमवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने विलच्या या कृतीचा निषेध केला आणि क्रिसला कानाखाली मारल्याबद्दल चौकशी सुरू केली. लॉस एंजेलिस पोलिस विभागाकडून सांगण्यात आलं की, त्यांना या घटनेची माहिती होती. परंतु त्याविषयी ते तपास करू शकत नाही. क्रिस याने पोलिस तक्रार दाखल करण्यास नकार दिला हाेता.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

Back to top button